एक्स्प्लोर
वसईत बापाने मुलाचा शाळेतील पहिला दिवस केला ‘रॉयल’, थेट रोल्स रॉयस आणि पाच गाड्यांच्या ताफ्यातून केली शाळेत एंट्री
Vasai news : आज सर्वत्र पितृ दिवस अर्थात फादर्स डे साजरा केला जातोय. मात्र वसई बापाने मुलाचा शाळेतील पहिला दिवस एकदम ‘रॉयल’ करत हा दिवस अविस्मरणीय केला आहे.
mumbai news
1/9

वसई : आज सर्वत्र पितृ दिवस अर्थात फादर्स डे साजरा केला जातोय. मात्र वसई बापाने मुलाचा शाळेतील पहिला दिवस एकदम ‘रॉयल’ करत हा दिवस अविस्मरणीय केला आहे. यात आपल्या लाडक्या पाल्याचं शाळेत थेट रोल्स रॉयस आणि पाच गाड्यांच्या ताफ्यातून शाळेत एंट्री केली आहे.
2/9

मुलाच्या शाळेतील पहिलाच दिवस अविस्मरणीय व्हावा, यासाठी वडिलांनी केलेल्या आगळ्यावेगळ्या स्वागताची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.
3/9

वसईमध्ये एका वडिलांनी आपल्या चार वर्षांच्या मुलाला पहिल्याच दिवशी शाळेत सोडण्यासाठी चक्क रोल्स रॉयससारख्या आलिशान गाडीचा वापर केला आणि त्याच्यासोबत पाच गाड्यांचा ताफा घेऊन शाळेपर्यंत एंट्री दिली.
4/9

या खास क्षणाचं आयोजन केलं होतं नवीत भोईर यांनी, जे पेशाने शिक्षक आहेत. ते वसईजवळील कामण परिसरातील खिंडीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत अध्यापन करतात.
5/9

12 जून रोजी त्यांच्या मुलाचा वसईमधील विद्या विकासिनी शाळेत पहिला दिवस होता. हा दिवस आपल्या मुलासाठी आयुष्यभर लक्षात राहावा यासाठी नवीत भोईर यांनी हटके संकल्पना राबवली.
6/9

भोईर यांनी आपल्या मुलाला रोल्स रॉयल या महागड्या आणि प्रतिष्ठित गाडीतून शाळेत पोहोचवलं. त्यासोबत पाच अन्य गाड्यांचा ताफा होता, आणि सर्व गाड्या फुलांनी सजवलेल्या होत्या.
7/9

गाड्यांबरोबर ढोल-ताशांच्या गजरात आणि आनंदाच्या वातावरणात शाळेपर्यंत रॅली काढण्यात आली. या शानदार ‘एंट्री’चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
8/9

लोकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा क्षण ‘गर्वाचा आणि आठवणीत ठेवण्यासारखा’ म्हटलं आहे, तर काहींनी हे प्रदर्शन असल्याचं सांगत त्यावर टीकाही केली आहे.
9/9

मात्र, आपल्या पद्धतीने आपल्या मुलाचा पहिला दिवस खास करण्यासाठी एका शिक्षक वडिलांनी घेतलेला हा पुढाकार समाजात चर्चेचा विषय ठरत आहे.
Published at : 15 Jun 2025 01:30 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















