एक्स्प्लोर
ठाण्यात चड्डी बनियान गँग सीसीटीव्हीत कैद, चोरट्यांचा शोध सुरु

ठाणे : नागरिकांच्या सर्तकेतेनं ठाण्यात मोठी घरफोडी टळली आहे. चड्डी बनियान गँगनं चोरीच्या इराद्यानं ठाण्यातल्या रौनक पार्क सोसायटीत प्रवेश केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला. तसंच ही गँग चोरीच्या आधी कशा शक्कली लढवतात, हेही सीसीटीव्हीत कैद झालं आहे. ठाण्यातल्या वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रौनक पार्कमधल्या बी विंगमध्ये रविवारी रात्री चड्डी गँगनं प्रवेश केला. त्यावेळी फ्लॅट धारकांचे दरवाजे बाहेरुन लावून घेतले. तसंच दरवाजाच्या दुर्बिणीला चिकटपट्टीही लावली. मात्र, दार तोडण्याचा आवाज ऐकताच रहिवाशांना शंका आली आणि त्यांनी सुरक्षारक्षकांना इंटरकॉमवरुन माहिती दिली. सुरक्षारक्षक येत असल्याची कुणकुण लागताच चोरट्यांनी धूम ठोकली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























