एक्स्प्लोर
तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर
मुंबई: मुंबईत काल मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर आली आहे. काल रात्री मध्य रेल्वे मार्गावरील विक्रोळी स्थानकावर सिग्नलमध्ये बिघाड झाला होता तर सायन रेल्वे स्थानकावर पेंटाग्राफ तुटला होता. तर दुसरीकडे मुंब्रा स्थानकाजवळचा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने मध्यरेल्वेची वाहतूक रात्री साडेआठ ते साडेअकरा पर्यंत ठप्प होती.
रात्री उशिराने वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली. मात्र, त्या ही ३ ते ४ तास उशिराने धावत होत्या. या सर्व प्रकाराने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मात्र प्रवाशांच्या सोईसाठी रात्री उशिरापर्यंत लोकल ट्रेन सुरू ठेवण्यात आल्या होत्या.
लोकल बरोबर लांब पल्ल्याच्या गाड्याही यामुळे खोळंबल्या होत्या. मध्य रेल्वेच्या या खोळंब्यामुळे प्रवाशांचे मात्र काल प्रचंड हाल झाले.
संंबंधित बातम्या:
मध्य रेल्वेचा बोजवारा, तीन स्टेशनवर तांत्रिक बिघाड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement