एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बये दार उघड म्हणणारी अन् सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हे विचारणारी मराठीच : मुख्यमंत्री

मराठी भाषा दिनानिमित्त विधानभवन परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.

मुंबई : बये दार उघड म्हणणारी मराठी होती अन् सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हे विचारणारीही मराठी भाषाच होती, असे गौरद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात बोलताना काढले. सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी खास ग्रंथदिंडी आणि ग्रंथप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ग्रंथदिंडीच्या पालखीचे भोई झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसंच विधानभवन परिसरात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाची पाहणीही मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी केली. यावेळी अनेक मान्यवरांनी मराठी भाषा दिनानिमित्त आपलं मत प्रदर्शित केलं. या कार्यक्रमस्थळी मायमराठीसाठी सर्वजण एकत्र येणे हे अनोखं दृश्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आपण सगळे इथं येऊन आईचा सन्मान करत आहोत. पहिले ते दहावी मराठी भाषा सक्तीची हे विधेयक बुधवारी मांडलं गेले तेव्हा पहिल्यांदा मला सभागृहात बसावसं वाटल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. प्रत्येक भाषेला परंपरा आणि वारसा आहे, तो जपणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मराठीचं काय होणार? ही दीन भावना आपल्या मनात का येते? मराठी भाषा दिन साजरा करताना चिंता का असते? अशा गोष्टी होता कामा नये. कारण, मराठी ही जिजाऊंची भाषा आहे. मराठीने काय दिलं? आपण इतिहास चिवडत असताना काही शिकत नाही. मराठी भाषा, संस्कृती टिकली पाहिजे, म्हणजे काय? आपल्याकडे शाळांची नाव मराठीत का नाही? संत तुकाराम, संत नामदेव, अशी नावं आपल्या शाळांना का नाहीत? असेही प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केले. बये दार उघड म्हणणारी अन् सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हे विचारणारी मराठीच : मुख्यमंत्री मराठी भाषा दिन | 'मराठी'साठी परिवहन विभागाचा अनोखा उपक्रम, प्रत्येक बसस्थानक रांगोळीने सजणार बये दार उघड म्हणणारी मराठीच होती - परकीय आक्रमण होत असताना बये दार उघड म्हणणारी मराठी होती. अन् सरकारच डोकं ठिकाणावर आहे का? हे विचारणारीही मराठी भाषाच होती, असे गौरद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काढले. शाळेत गेलो म्हणजे भाषा येते असं नाही. ती आत्मसात करावी लागते. त्यामुळेच मराठी भाषा अनिवार्य झाली पाहीजे. आज मला माझी मा आठवली, तिने पाटीवर अ, आ गिरवून शिकवले, ते विसरू शकत नाही. पण, आता दगडी पाट्या गेल्या. आता मोबाईल आलेत. परिणामी, आज किती जण लिहितात माहीत नाही. मोबाईल आल्यामुळे आता लिहिता येत नाही. त्यामुळे बाहेरचे गोंधळी आत आले, तर आतले काय काम करणार? असं झालंय. मी मुख्यमंत्री झालो, पण उद्या आपली आठवण काढली जाईल का? तेवढे जरी केलं तरी भरपूर आहे. मराठी बोलत राहिलो तरी कशाची आवश्यकता नसल्याचे सांगत संपूर्ण आयुष्य मराठी असू द्या, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचे विधेयक विधानपरिषदमध्ये मंजूर उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण : इंग्रजी माध्यमात मुलं गेली तरी घरात मराठी संस्कृती जपली पाहिजे. घरात आज अनेकांना गुढीपाडवा माहीत नाही. अभिजात भाषा दर्जासाठी पाठपुरावा सुरू आहे. केंद्र सरकार लवकरात लवकर दर्जा देईल अपेक्षा आहे. मराठी भाषा ही उद्योगाची भाषा व्हावी. आपल्याकडे इंग्रजी ज्ञान भाषा मानली जाते, इंग्रजीचा पगडा वाढला आहे. पहिलीपासून मराठी अनिवार्य हा कायदा करण्याची वेळ का आली? नवीन पिढीतील माझे सहकारी मी पाहतो मराठी बोलता येतं पण वाचता येत नाही. ते इंग्रजीत लिहितात नंतर भाषातंर करून घेतात, अशांची नंतर काय परिस्थिती होईल? साहित्य महोत्सवापेक्षा खाद्य महोत्सवात गर्दी का जास्त होते? तान्हाजी सारखा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवतो. होतकरू तरुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवरील भाषिकांच्या मागे ठाम उभे राहणार, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व प्रयत्न हे सरकार करणार. 'मराठी बाणा'वरुन अशोक हांडेंना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले मुंबई लोकलमध्ये दोन लोकं एकमेकांशी मराठीत बोलत नाही. दुसऱ्या राज्यात इंग्रजी आले तरी ते आपल्या भाषेत बोलतात. इतरांना मराठीच कौतुक, पण आपणच मराठीपासून दूर पळत आहोत. परदेशात अनेक मराठी माणूस राहतात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे त्यासाठी सगळेजण प्रयत्न करू. रामराजे निंबाळकर - ग्रामीण भागातील मुलं शहरात येतात तेव्हा त्यांना भाषेची अडचण येते, इंग्रजीला महत्व आहे. आपल्याला इंग्रजी येत नाही, मनात ही खंत वाटते, ती दूर केली पाहिजे. ग्रामीण भागात आमच्या अनेकांच्या संस्था आहेत. इंग्रजी माध्यमातील शाळा नसत्या तर संस्था राहिल्या असत्या का? परिस्थिती अशी की मुलं इंग्रजीत शिकतात, घरी मराठी बोलतात आणि मग एकही भाषा नीट येत नाही. Marathi Bhasha Din | मराठीतील चुका सुधारण्यासाठी अॅप, निवास पाटील तरुणाकडून निर्मिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Ahmednagar City Assembly Constituency : दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Embed widget