एक्स्प्लोर
'मराठी बाणा'वरुन अशोक हांडेंना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
मराठी बाणावरुन लोककलाकार अशोक हांडे यांना तूर्तास कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. शेमारुने आपल्या नव्या वाहिनीच्या नावात मराठी बाणा वापरण्यास हरकत नाही, असंही हायकोर्टाने नमूद केलं आहे. ट्रेडमार्क कायद्यावरून अशोक हांडे यांनी शेमारुविरोधात 200 कोटी रुपयांचा दावा केला होता.
मुंबई : 'मराठी बाणा' या शब्दांवरुन लोककलाकार अशोक हांडे आणि शेमारु कंपनीत सुरु असलेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने अशोक हांडेंना तूर्तास कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. तसंच शेमारुने आपल्या नव्या वाहिनीच्या नावात 'मराठी बाणा' शब्द वापरण्यास हरकत नाही, असंही हायकोर्टाने नमूद केलं आहे. शेमारु या कंपनीने नव्याने सुरु केलेल्या सॅटेलाईट चॅनलच्या नावात 'मराठी बाणा'चा उल्लेख केला आहे. परंतु कंपनीने हा उल्लेख वगळून आपल्याला नुकसान भरपाई म्हणून 200 कोटी रुपये देण्याची मागणी अशोक हांडे यांनी याचिकेतून केली आहे.
संगीताच्या माध्यमातून अवघ्या जगाला मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणारे दिग्दर्शक, गायक अशोक हांडे यांचा 'मराठी बाणा' हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सर्वश्रुत आहे. त्यासाठी त्यांनी 'चौरंग' या आपल्या संस्थेच्या माध्यमातून 'मराठी बाणा' या शिर्षकाचं ट्रेडमार्क घेतलं आहे. असं असतानाही 'शेमारु' या कंपनीने आपल्या नव्या मराठी चॅनलच्या नावात 'मराठी बाणा' या शब्दाचा उल्लेख केल्याने ट्रेडमार्क कायद्याचं उल्लंघन झाल्याचा दावा अशोक हांडेंनी केला आहे. याविरोधात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायमूर्ती बी.पी. कोलाबावाला यांच्यासमोर सुनावणी झाली.
'मराठी बाणा' कुणाचा? अशोक हांडेंचा शेमारुविरोधात 200 कोटींचा दावा; हायकोर्टात मंगळवारी फैसला
मात्र मराठी बाणा हा सर्व प्रचलित शब्द असून या शब्दातून मराठी भाषेचं तिच्या अस्मितेचं दर्शन होतं. अनेकदा हा शब्द स्वाभिमान दाखवण्यासाठीच वापरला जातो. एवढेच काय तर 19व्या शतकापासून मराठी बाणा या शब्दाचा वापर होत असून अनेक ऐतिहासिक पुस्तकं, शालेय पुस्तकं, कादंबऱ्यांमध्येही या शब्दाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे 'मराठी बाणा' या शब्दावर कुणाचाही वैयक्तिक दावा असू शकत नाही. मराठी बाणा ही एक भावना आहे. कोणीही मराठीच्या स्वाभिमानसाठी हा शब्द वापरु शकतो. मराठी वाङमय भाषेचा इतिहास, याबद्दल बोलताना या शब्दाचा सर्रासपणे वापर करण्यात येतो. तसंच अनेक वृत्तपत्र, सोशल मीडिया, टीव्ही वाहिन्यांवरील शोवर सुद्ध 'मराठी बाणा' या शब्दांचा खुलेआम वापर करत कार्यक्रम केले जातात. त्यामुळे याचिकाकर्त्यांद्वारे या शब्दांबाबत आक्षेप घेणं चुकीचे आहे,असा युक्तीवाद शेमारु कंपनीच्यावतीने अॅड. हिरेन कमोद यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला.
शेमारुविरोधात अशोक हांडे यांनी माहिम पोलीस ठाण्यात 26 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी काहीच कारवाई न केल्याने हांडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. या कंपनीने 'मराठी बाणा' हे नाव तात्काळ हटवावं तसंच नुकसान भरपाई म्हणून 200 कोटी रुपये देण्याचे आदेश हायकोर्टाने कंपनीला द्यावेत, अशी मागणी अशोक हांडे यांनी याचिकेत केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement