एक्स्प्लोर
मुंबईत इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली गाडी दबून ड्रायव्हर जखमी
मुंबई : मुंबईतील दादरमध्ये जुन्या इमारतीचं तोडकाम चालू असताना तिचा एक भाग कोसळून ढिगाऱ्याखाली गाडी दबल्याची घटना घडली. दादर पूर्वमधील ही घटना आहे. या घटनेत ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. तर आणखी काही जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.
दादर टीटी जवळच्या उड्डाणपुलाडवळ एका जुन्या इमारतीचं तोडकाम करण्यात येत होतं. मात्र तोडकाम सुरु असताना अचानक इमारतीचा एक भाग कोसळला. त्यावेळी तिथे उभी असलेली MH 02 CR 6167 ही कार ढिगाऱ्याखाली दबली गेली.
ढिगाऱ्याखाली दबली गेलेली ओला कार असल्याची माहिती आहे. कारमध्ये ड्रायव्हरसह अन्य दोन प्रवासी होते. मात्र सुदैवाने यात प्रवासी सुखरुप बचावले, तर ड्रायव्हर जखमी झाला, असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अग्नीशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement