एक्स्प्लोर
वसईतील तुंगारेश्वर धबधब्यावर तरुण बुडता-बुडता वाचला
या मुलाला वाचवतानाचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले. वसईतील चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या रिंकू मिश्रा या धाडसी तरुणाने बुडणाऱ्या मुलाला वाचवलं.
वसई : वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर शुक्रवारपासून पर्यटक बुडण्याची मालिकाच सुरू झाली आहे. शुक्रवार आणि रविवार या 2 दिवसात 4 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पण सोमवारी मात्र एका तरुणाला बुडताना वाचवण्यात यश आलं आहे.
या मुलाला वाचवतानाचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले. वसईतील चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या रिंकू मिश्रा या धाडसी तरुणाने बुडणाऱ्या मुलाला वाचवलं. 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीप्रमाणेच काहीसं या ठिकाणी घडलं.
तुंगारेश्वरच्या धबधब्यावर सोमवारी काही तरुणांचा ग्रुप पोहण्यासाठी आला. तेवढ्यात कुणाला काही कळण्याच्या आत एक तरुण अचानक बुडू लागला. काहीजण सेल्फीच्या नादात होते. तेवढ्यात एकजण बुडतोय असं लक्षात आल्यावर सर्वांची धांदल उडाली.
तेवढ्यात त्याच ठिकाणी पोहत असेलेल्या रिंकू मिश्रा या तरुणाने प्रसंगावधान राखून बुडणाऱ्या तरुणांच्या केसाला पकडून ठेवलं आणि इतरांच्या मदतीने त्याला बाहेर काढलं. या सर्व प्रकाराचं चित्रीकरण आजूबाजूला उभ्या असलेल्या तरुणांनी मोबाईलमध्ये केलं.
बुडणाऱ्या तरुणाला किनार्यावर आणल्यावर सुरुवातीला त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. इतरांच्या मदतीने त्याच्या पोटातील पाणी काढलं आणि त्याला जीवदान मिळालं. पाण्याचा प्रवाह आणखी वाढला असता तर कदाचित वाचवण्याच्या नादात रिंकूही बुडाला असता. त्या तरुणाला वाचवल्यावर रिंकूलाही चक्कर आणि उलट्या झाल्याचं त्याने सांगितलं. रिंकू वसईच्या सनसिटी परिसरात एक चहाचं दुकान चालवतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement