एक्स्प्लोर
मेहुल चोक्सीबाबत जेजेतील डॉक्टरांना सीलबंद अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश
प्रकृती अस्वास्थामुळे भारतात येण्यास नकार देणाऱ्या मेहुल चोक्सीसाठी 'एअर अँब्युलन्स' पाठवण्याची तयारीही तपासयंत्रणेनं दर्शवली आहे.
मुंबई : मेहुल चोक्सीबाबत मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी 9 जुलैपर्यंत आपला सीलबंद अहवाल सादर करण्याचे निर्देश सोमवारी हायकोर्टाने दिले आहेत. मेहुल चोक्सीची सध्या प्रकृती कशी आहे?, भारतात येण्यासाठी विमान प्रवास करण्याइतपत तो फिट आहे का? याबबत त्याचे सध्याचे सर्व मेडिकल रिपोर्ट्स आणि रेकॉर्डस् जेजे रुग्णालय प्रमुखांकडे चोक्सीच्या वकिलांनी सोमवारपर्यंत सादर करावेत असे आदेश न्यायमूर्ती इंद्रजित महंती आणि न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या खंडपीठानं दिले आहेत.
प्रकृती अस्वास्थामुळे भारतात येण्यास नकार देणाऱ्या मेहुल चोक्सीसाठी 'एअर अँब्युलन्स' पाठवण्याची तयारीही तपासयंत्रणेनं दर्शवली आहे. 'मला भारतापर्यंतचा प्रवास झेपणार नाही, तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनीच अँटिंग्वाला चौकशीसाठी यावे, अथवा व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे चौकशी करावी'. असा कांगावा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीनं केला आहे.
मागील आठवड्यात पंजाब नॅशनल बँकेच्या हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्सीने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. 'मी प्रकृती अस्वास्थतेच्या कारणास्तव भारतात येऊ शकत नाही. मला हदयविकाराचा त्रास आहे. त्यामुळे मी लांबचा प्रवास करु शकत नाही. ईडीच्या(सक्तवसुली संचालनालय) अधिकाऱ्यांनीच ऍटिंग्वा येथे यावे आणि हवी ती चौकशी करावी किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे माझी चौकशी करावी, असे प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे'. याला ईडीच्यावतीनं प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्यात आले आहे.
चोक्सी हा केवळ प्रकृतीचा कांगावा करुन तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करत आहे, असे ईडीने यात म्हटलं आहे. आम्ही त्याच्यासाठी डॉक्टरांनी सज्ज असलेली एअर ऍम्ब्युलन्स पाठवतो मात्र त्याने भारतात परत यावे, असे इडीने कोर्टात दाखल केलेल्या या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement