एक्स्प्लोर

निवृत्तीनंतरही सरकारी निवासस्थान न सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेंशनमधून दंडात्मक भाडेवसूली योग्यच : हायकोर्ट

सरकारी निवासस्थानात अतिरिक्त तेवीस महिने राहिल्यामुळे त्यांच्याकडून दंडात्मक भाडे म्हणून सुमारे 18.35 लाख रुपये मिळणे बाकी आहे, असं स्पष्ट करत यापैकी सुमारे 16.98 लाख रुपये त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक निधीतून वगळण्यात आले असून उर्वरित रकमेसाठी त्यांनी अधिकाऱ्यांना भेटावे, असे निर्देश त्यांना देण्यात आले.

मुंबई : निवृत्तीनंतरही सरकारी निवासस्थान रिकामी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या निवृत्तीवेतनातूनही दंडात्मक भाडेवसुली प्रशासन करु शकते, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. अशाप्रकारे केलेली वसुली रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करणाऱ्या कर्मचाऱ्याला हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला आहे. मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी अभियंता पदावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने महापालिकेच्या अश्या वसुलीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. साल 2012 मध्ये याचिकादार कर्मचारी महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाला. सेवेत असताना साल 2000 पासून त्यांना शिवडी येथील पालिका कर्मचारी निवासस्थानामध्ये राहण्याची सुविधा मिळाली होती. निवृत्तीनंतर तीन महिन्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यानं ही जागा खाली करणं बंधनकारक असतं. मात्र याचिकाकर्त्याला साल 2013 मध्ये पालिकेच्या उद्यान विभागात सल्लागार म्हणून सहा महिन्यांची नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे त्यांनी हे निवासस्थान कायम ठेवले. त्यानंतर साल 2015 मध्ये त्यांनी हे सरकारी निवासस्थान खाली केले. मात्र त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे साल 2017 मध्ये त्यांना महापालिकेकडून भाडेवसुलीसाठी नोटीस बजावण्यात आली. सरकारी निवासस्थानात अतिरिक्त तेवीस महिने राहिल्यामुळे त्यांच्याकडून दंडात्मक भाडे म्हणून सुमारे 18.35 लाख रुपये मिळणे बाकी आहे, असं स्पष्ट करत यापैकी सुमारे 16.98 लाख रुपये त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक निधीतून वगळण्यात आले असून उर्वरित रकमेसाठी त्यांनी अधिकाऱ्यांना भेटावे, असे निर्देश त्यांना देण्यात आले. याविरोधात या कर्मचाऱ्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. महापालिकेची नोटीस व भाडे वसुल करण्याची ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली होती. मात्र पालिकेनं यास विरोध केला, निवृत्तीच्या आधी पाच महिने कर्मचाऱ्याने त्याच्या निवृत्ती भत्यांमधून अशाप्रकारची संबंधित वसुली करण्याची परवानगी महापालिकेला दिली आहे. तसेच त्यांनी निवासस्थान खाली केले नाही तर त्यासाठी त्यांना दंड भरावा लागेल, याचीही पूर्वकल्पना त्यांना देण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही कारवाई त्यांना अंधारात ठेवून केलेली नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत याचिकादाराची मागणी फेटाळली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतातTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM :  8 नोव्हेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Embed widget