Bombay High Court : कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय, पानसरे कुटुंबियांना धक्का
Bombay High Court on Govind Pansare Murder Case : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आता हायकोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Bombay High Court on Govind Pansare Murder Case : " कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आता हायकोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज नाही", असं म्हणत पानसरे कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाकडून निकाली काढण्यात आली आहे. मात्र साल 2016 पासून कोल्हापूर सत्र न्यायालयात सुरू असलेला खटला दररोज सुनावणी घेत लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत.
Govind Pansare murder: Bombay High Court ends monitoring of probe, orders quick trial
— Bar and Bench (@barandbench) January 2, 2025
Read story here: https://t.co/tgJhVbDOSf pic.twitter.com/s4SBGCIP87
याप्रकरणी हायकोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याचा दावा करत आरोपींनी दाखल केलेल्या याचिकाही हायकोर्टाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांची 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापुरातील राहत्या घरात गोऴ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राज्य सरकारनं एसआयटी स्थापन करत याप्रकरणाची चौकशी सुरू केली होती. मात्र कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा छडा लागेपर्यंत याप्रकरणी तपासयंत्रणेला कोणतंही यश आलेलं नव्हतं. गौरी लंकेश प्रकरणी कर्नाटक एटीएसनं महाराष्ट्रात येऊन आरोपींनी अटक केल्यानंतर दाभोलकर-पानसरे हत्याकांडातील आरोपी एकच असल्याचं समोर आलं होतं.
#Govind Pansare murder case: Bombay High Court disposes of plea filed by accused against High Court monitoring the case.
— Bar & Bench - Live Threads (@lawbarandbench) January 2, 2025
. pic.twitter.com/pyyOoyZM6d
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आता हायकोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज नाही
पानसरे कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाकडून निकाली
मात्र साल 2016 पासून कोल्हापूर सत्र न्यायालयात सुरू असलेला खटला दररोज सुनावणी घेत लवकरात लवकर निकाली काढण्याचे हायकोर्टाकडून आदेश
याप्रकरणी हायकोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याचा दावा करत आरोपींनी दाखल केलेल्या याचिकाही हायकोर्टाकडून निकाली
16 फेब्रुवारी 2015 रोजी कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे यांची कोल्हापुरातील राहत्या घरात गोऴ्या झाडून हत्या करण्यात आली होती
राज्य सरकारनं एसआयटी स्थापन करत याप्रकरणाची चौकशी सुरू केली होती
मात्र कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा छडा लागेपर्यंत याप्रकरणी तपासयंत्रणेला कोणतंही यश आलेलं नव्हतं
गौरी लंकेश प्रकरणी कर्नाटक एटीएसनं महाराष्ट्रात येऊन आरोपींनी अटक केल्यानंतर दाभोलकर-पानसरे हत्याकांडातील आरोपी एकच असल्याचं समोर आलं होतं
इतर महत्त्वाच्या बातम्या