एक्स्प्लोर

घाटकोपरमधील महिलेचा मृत्यू महापालिकेच्या चुकीमुळे झालेला अपघात की घातपात?

मुंबईतील घाटकोपरमध्ये गटारातून वाहून गेलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची मुंबई महापालिका चौकशी करणार आहे.मृतदेह गटारातून वाहत आला तरी तो माहिम इथे मिळणे अपेक्षित आहे. पण तब्बल 20 ते 20 किमीचा प्रवास करुन हाजीअलीच्या समुद्रकिनारी महिलेचा मृतदेह मिळाला, असं बीएमसी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

मुंबई : मुंबईतील घाटकोपरमध्ये गटारातून वाहून गेलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची मुंबई महापालिका चौकशी करणार आहे. मुंबई महापालिकेच्या चुकीमुळे अपघात झाला की हा घातपात आहे, हे लवकरच समोर येईल.

मुंबईत शनिवारी (3 ऑक्टोबर) झालेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. यावेळी घाटकोपरच्या असल्फा भागातून पर्जन्य जलवाहिनीतून शीतल भानुशाली नावाची 32 वर्षीय महिला वाहून गेल्याची घटना समोर आली. आज पहाटे 3 वाजता संबंधित महिलेचा मृतदेह थेट हाजीअलीच्या समुद्रकिनारी आढळला.

घाटकोपरमध्ये उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह हाजीअली समुद्रकिनारी सापडला

पण असल्फा ते हाजीअली हे अंतर जवळपास 20 ते 22 किमी आहे. मृतदेह कुठेही न अडकता एवढ्या अंतरावर जाणं शक्य नसल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. शिवाय, महापालिकेने पर्जन्य जलवाहिन्या, गटारातून वाहणाऱ्या पाण्यातील कचरा अडवण्यासाठी जागोजागी मोठमोठ्या जाळ्या, ग्रील्स लावले आहेत. असल्फाच्या पुढे साकीनाका इथेही लावलेल्या ग्रील्सच्या ठिकाणी दररोज अडकलेला कचरा उपसला जातो. असल्फा येथील वाहिनी ही मिठी नदीला माहिम येथे येऊन मिळते. त्यामुळे मृतदेह वाहत आला तरी तो माहिम येथे मिळणे अपेक्षित असायला हवे होते. त्यामुळे तब्बल 20 ते 20 किमीचा प्रवास करुन हाजीअलीच्या समुद्र किनारी महिलेचा मृतदेह मिळाला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

त्यामुळेच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांनी उपायुक्तांना या प्रकरणी चौकशी करुन 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून काही धागेदोरे मिळतात का हे पाहिले जात आहे. शिवाय पोलीसही तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

जीवाची पर्वा न करता भर पावसात, तुंबलेल्या पाण्यात 'ती' तब्बल सात तास उघड्या मॅनहोलजवळ उभी राहिली!

मॅनहोलमध्ये सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास नुकसानभरपाईचं काय? हायकोर्टाचा सरकारला सवाल

मुंबईतील उघड्या गटारीत पडलेल्या चिमुकल्या दिव्यांशचा शोध थांबवला, महापालिकेची माहिती

बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉ. दीपक अमरापूरकरांचा मृतदेह सापडला

घाटकोपरमध्ये उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह हाजीअली समुद्रकिनारी सापडला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Rain Updates : वादळी वारे, विजांच कडकडाट; मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊसABP Majha Headlines : 9 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRatan Tata Last Rites : रतन टाटा नावाच्या झंझावाताचा अंत, मुंबईत अंत्यसंस्कार | FULL VIDEOManoj Jarange on Chhagan Bhujbal  : ओबीसीमध्ये समावेश होणाऱ्या 15 जातींना भुजबळांचा विरोध नाही का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Embed widget