(Source: ECI/ABP News/ABP Majha)
घाटकोपरमध्ये उघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह हाजीअली समुद्रकिनारी सापडला
मुंबईच्या घाटकोपरमध्ये उघड्या गटारात पडून वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह हाजी अली समुद्रकिनारी सापडला आहे.
मुंबई : मुंबईच्या घाटकोपरमध्ये उघड्या गटारात पडून वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह समुद्रकिनारी सापडला आहे. शीतल भानुशाली असं या महिलेचं नाव आहे. हाजीअली समुद्रकिनारी त्यांचा मृतदेह आढळून आला. साचलेल्या पाण्यातून वाट काढत असताना मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला.
घाटकोपर परिसरातील असल्फा या ठिकाणी ही दुर्घटना घडली होती. दळण आणण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या होत्या. त्यांच्या नेहमीच्या रस्त्यावर पाणी साचल्याने त्यांनी दुसऱ्या मार्गावरुन जाण्याचा निर्णय घेतला. पण याच दरम्यान उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्या वाहून गेल्या. अखेर त्यांचा मृतदेह हाजीअली किनारी आढळला.
मुंबईत पावसाळ्यात अशा घटना घडतात. त्यामुळे सावधानता बाळगण्याची सूचना वेळोवेळी दिली जाते. काही दिवसांपासून मुंबईत पाऊस असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. यावेळी मॅनहोल उघडे ठेवून साचलेल्या पाण्याला वाट करुन दिली जाते. मात्र या उघड्या मॅनहोलमध्ये पडून वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
तीन वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या तुफान पावसात बॉम्बे हॉस्पिटलमधील पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर बेपत्ता झाले होते. यानंतर त्यांचा मृतदेह वरळी समुद्रकिनारी सापडला होता. मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांचा मृतदेह वरळीजवळ सापडला होता.
संबंधित बातम्या
जीवाची पर्वा न करता भर पावसात, तुंबलेल्या पाण्यात 'ती' तब्बल सात तास उघड्या मॅनहोलजवळ उभी राहिली!
मॅनहोलमध्ये सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास नुकसानभरपाईचं काय? हायकोर्टाचा सरकारला सवाल
मुंबईतील उघड्या गटारीत पडलेल्या चिमुकल्या दिव्यांशचा शोध थांबवला, महापालिकेची माहिती
बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉ. दीपक अमरापूरकरांचा मृतदेह सापडला
Mumbai Rain | मॅनहोलमध्ये पडलेल्या आशिषचा कठडा धरल्याने जीव वाचला | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा