एक्स्प्लोर

एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी

सरकारने रात्री एक शुद्धीपत्रक काढलं आहे. त्यामध्ये धनगर आहे तिथे धनगड वाचावे असे सांगितले होते. पण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी यामध्ये बदल करुन हवा तसा ड्राफ्ट दिल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. 

Gopichand Padalkar : ज्या गोष्टीची वाट पाहतोय त्याच्या जवळ आता आपण पोहोचल्याचे मत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (
Gopichand Padalkar) यांनी व्यक्त केलं. सरकारने रात्री एक शुद्धीपत्रक काढलं आहे, त्या पत्रात धनगर आहे तिथे धनगड वाचावे असे सांगितल्याचे पडळकर म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना देखील हे पत्र कुणी काढले हे माहीत नव्हते. पण सकाळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या शुद्धीपत्रकात बदल करुन आपल्याला हवा तसा ड्राफ्ट दिल्याचे पडळकर म्हणाले. 

दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना

महसूल व वन विभागामार्फत प्रसिद्ध झालेले शुद्धिपत्रक हे कोणालाही विश्वासात न घेता खोडसाळपणे अधिकाऱ्यांनी आदिवासी विभागाच्या संगनमताने प्रसिद्ध केले होते असे पडळकर म्हणाले. ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ हे शुद्धिपत्रक रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या.  तसेच , महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी ही संपर्क साधून , दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या असे पडळकर म्हणाले. 

ओबीसीतून आरक्षण भेटले तर फायदा होतो हा गैरसमज 

कपाळावर जो आडवा भंडारा लावतो तो समजाची आडवी मांडणी करतो, पण जो आडवा येतो त्याला आडवा करतो असेही पडळकर म्हणाले. आरेवाडीमधील बिरोबा बनातील दसरा मेळाव्यात पडळकर बोलत होते. ओबीसीतून आरक्षण भेटले तर फायदा होतो हा गैरसमज असल्याचेही पडळकर म्हणाले. 

वाद होण्यासाठी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली जातेय

आता भांडणे करायची ही वेळ नसल्याचे पडळकर म्हणाले. ओबीसी-मराठा वाद पेटवला जातोय, यामागे अनेक कारणे असल्याचेही ते म्हणाले. वाद होण्यासाठी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली जात आहे. ओबीसीतून आरक्षण भेटले तर फायदा होतो हा गैरसमज असल्याचे पडळकर म्हणाले. ओबीसीतून आरक्षण भेटले तर कल्याण होते असे सांगून गरीब मराठा समाजाला का फसवले जातंय? असा सवाल देखील पडळकरांनी उपस्थित केला. गावगाड्यात मराठा-ओबीसी हा वाद अनाठायी असल्याचे पडळकरांनी सांगितलं. सरकारनं धनगर समाजाला आरक्षण द्यावे आणि समाजाला भंडारा उधळण्याची संधी द्यावी असे मतही पडळकर यांनी व्यक्त केलं. 

आमचे डॉक्युमेंट रद्द करण्याचे षडयंत्र, बजाज नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करा : प्रकाश शेंडगे

धनगर आरक्षणाचा जी आर काढण्यासाठी जे कागदपत्र दिले आहेत, त्यात एक स्टँप ड्युटी देण्यात आली  असल्याचे मत प्रकाश अण्णा शेंडगे यांनी व्यक्त केले. काल एक पत्र काढण्यात आले धनगड असं वाचावे असे सांगण्यात आले आहे. हे आमचे डॉक्युमेंट रद्द करण्याचे षडयंत्र करण्यात आल्याचे शेंडगे म्हणाले.  
पण रातोरात आम्ही ते बदल करण्यास सांगितले. बजाज नावाच्या अधिकाऱ्याने कोणत्याही मंत्र्याला न विचारता शुधीपत्रक काढले आहे. आम्ही मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आणि रद्द करण्याचे दुसरे शुद्धिपत्र काढण्यात आले. बजाज नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी शेंडगे यांनी दिली. या अधिकाऱ्याल निलंबीत करावं आणि धनगर समाजाची माफी मागावी असेही शेंडगे म्हणाले. आजच्या कॅबिनेटमध्ये हा विषय घेण्याची मागणी केली आहे. पण पुढच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात येईल. फडणवीस यांनी शब्द दिला होता, देवा भाऊ जो बोलता है वो करता है असे शेंडगे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

धनगड संपुष्टात! सरकारने काढलेल्या धनगड जातीचे दाखले रद्द, धनगर आरक्षणात आडवा येणारा महत्त्वाचा मुद्दा निकाली

महत्त्वाच्या बातम्या

मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Embed widget