एक्स्प्लोर
अनधिकृत बांधकामप्रकरणी बीएमसीची इरफान खानला नोटीस

मुंबईः कपिल शर्माच्या पाठोपाठ अभिनेता इरफान खानलाही अनधिकृत बांधकामप्रकरणी मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. गोरेगाव पश्चिम येथील इमारतीत इरफानने डक्ट आणि कारडेक्टची जागा सदनिकेत समाविष्ट केल्यामुळे नोटीस पाठवण्याची कारवाई करण्यात आली आहे. ज्या इमारतीत कपिल शर्माचं अनधिकृत बांधकाम केलेली सदनिका आहे. तिथंच हे बांधकाम आहे. या अनधिकृत बांधकामांप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं या दोन्हीही अभिनेत्यांना नोटीस बजावली आहे. महापालिकेकडून अजून कोणकोणत्या कलाकारांकडून अनधिकृत बांधकाम केलं आहे, याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान महापालिकेच्या पुढील कारवाईवर आता लक्ष लागलं आहे. कपिल शर्माने महापालिकेवर लाच मागितल्याचा आरोप केल्यानंतर त्याचीच गोची झाली आहे.
आणखी वाचा























