एक्स्प्लोर

BMC Budget : मुंबई महापालिकेचं यंदा इलेक्शन बजेट, गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन हजार कोटींची वाढ अपेक्षित 

BMC Budget : एकीकडे पालिकेच्या मुदत ठेवी आठ हजार कोटींनी घटल्या आहेत तर दुसरीकडे  उत्पन्नाचे नवे स्रोत आटल्याचं चित्र आहे. मात्र तरीही निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन फुगीर बजेट सादर होण्याची शक्यता आहे. 

Mumbai Budget : मुंबई महापालिकेचं बजेट (Budget)2 फेब्रुवारी रोजी सादर होणार असून गेल्या वर्षीपेक्षा बजेटमध्ये तीन हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे.  गतवर्षीच्या 52,619 कोटींवरून यावर्षीचा बजेट 55 हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. 

BMC Budget 2024 : मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपल्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून पालिकेच्या कारभाराचा गाडा आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्या माध्यमातून  हाकला जात आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच प्रशासकाकडून बजेट सादर करण्यात आलं होतं. तर आता सलग दुसर्‍या वर्षीदेखील पालिकेच्या निवडणुका झाल्या नसल्याने प्रशासकच बजेट सादर करणार आहेत.

गेल्या वर्षी पालिकेच्या बजेटमध्ये 14.52 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. तर यावर्षीदेखील बजेटमध्ये विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वाचे मुद्दे

मुंबईकरांवरची करवाढ टळणार

कोरोना काळात पालिकेने दोन वर्षे मुंबईकरांवर कोणत्याही करवाढीचा बोजा टाकला नाही. त्यामुळे मालमत्ता करासारख्या करवाढीचे प्रस्ताव अंमलबजावणीविना पडून आहेत. मात्र आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने मुंबईकरांवर कोणत्याही करवाढीचा बोजा पडणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बेस्ट साठी तरतुद 

या वर्षी ‘बेस्ट’ प्रशासनानं तीन हजार कोटी रुपये सहाय्य स्वरूपात करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यावर्षी पालिका ‘बेस्ट’ला किती मदत करते याकडे लक्ष लागले आहे

ठेवी घटल्याने अंतर्गत कर्जाचा पर्याय

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, सिमेंट काँक्रिट रस्ते, प्रस्तावित समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रकल्प अशा प्रकल्पांसाठी मोठी तरतूद करावी लागणार आहे. मात्र गेल्या वर्षभरात पालिकेच्या 92 हजार कोटींच्या  ठेवींमधील आठ हजार कोटींच्या ठेवी घटल्याने मोठ्या प्रकल्पांची देणी देण्यासाठी अंतर्गत कर्जाचा विचार होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे बजेटचा आकडा मोठा दिसेल.

मोठ्या प्रकल्पांकरता निधी

गेल्या वर्षीच्या 53 हजार कोटींच्या बजेटमध्ये 27,247 कोटींच्या प्रकल्पांवर पालिका आयुक्तांनी 52 टक्के निधी ठेवला होता. यावेळी पालिका आयुक्तांनी बजेटमध्ये आणखी वाढ करून एकूण बजेटच्या 56 टक्के निधी प्रकल्पांवर खर्च केला जाईल अंदाज बांधला जात आहे.

पायाभूत सोयीसुविधांवर भर 

पाणी समस्या आणि स्वच्छतेवर भर देणार असून, मुंबईतील कचऱ्याची समस्या सोडवण्यासोबतच त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यावर भर देणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईला खड्डेमुक्त करण्यावर विशेष लक्ष असेल. याकरता तरतुदी होण्याची शक्यता आहे. 

बीएमसीची आर्थिक परिस्थिती हाताळण्याचे आव्हान

बीएमसीच्या रिकाम्या तिजोरीत पैसा कुठून येणार याची अर्थसंकल्पात तरतूद करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. कारण रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बीएमसीला मुदत ठेवींमधून पैसे काढावे लागतात. 2022 मध्ये बीएमसीच्या मुदत ठेवी 91,690 कोटी रुपये होत्या. जे 2023 मध्ये अंदाजे 5,000 कोटी रुपयांनी कमी होऊन 86,410 कोटी रुपये झाले आहे. मुंबईत 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे, त्यामुळे बीएमसीला दरवर्षी 4,500 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.  

स्वच्छता आणि सुशोभिकरणावर विशेष लक्ष

मुंबई स्वच्छ ठेवण्य़ासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर पालिकेच्या घनकचरा विभागाकडून संपूर्ण मुंबईत स्वच्छता मोहिम राबवली जाते आहे. मुख्यमंत्री स्वतः मोहिमेत उतरून लक्ष देत आहेत. पर्यावरणाच्यादृष्टीनेही विविध योजना राबवल्या जाणार आहेत. तसेच पाणी प्रकल्प, नवीन जलवाहिन्या टाकणे, शिक्षण, आरोग्य तसेच समुद्राचे पाणी गोडे करणे, कोळीवाड्य़ांचा विकास, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, मार्केट, सिमेंट काँक्रिटिकरणाचे रस्ते, कचरा विल्हेवाटीसाठी योजना आदी प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Superstar First Appeared In Front Of Camera: 47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
Mumbai Traffic : अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट

व्हिडीओ

Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Superstar First Appeared In Front Of Camera: 47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
Mumbai Traffic : अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
Embed widget