एक्स्प्लोर
मुंबईत 30-35 जागांवर शिवसेनेला मनसे फॅक्टर महागात
मुंबई : मुंबई महापालिकेतल्या सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष अपक्ष आणि इतर पक्षांच्या कुबड्या कशा घेता येतील, याचा विचार करत आहेत. मात्र शिवसेनेला अनेक ठिकाणी मनसे फॅक्टर महागात पडला आहे.
मुंबईत शिवसेनेला 84 जागा मिळाल्या आहेत. चार अपक्षांची साथ लाभल्याने सेनेचं संख्याबळ 88 झालं आहे. मात्र 30-35 ठिकाणी सेनेच्या उमेदवारांना मनसे फॅक्टर महागात पडला आहे. शिवसेनेच्या हक्काच्या मराठी मतांची विभागणी झाली आणि काँग्रेस किंवा भाजपच्या पारड्यात विजय पडला.
खरं तर निवडणुकीपूर्वीच राजानं टाळीसाठी हात पुढे केला होता. पण, सेनेनं हात आखडता घेतला. मनसे, शिवसेनेच्या युतीची टाळी वाजलीच नाही आणि दोघांच्या दुराव्यात फायदा मात्र तिसऱ्याचाच झाला. त्यामुळे मनसेनं पुढे केलेला हात सेनेनं हातात घेतला असता तर चित्र काही वेगळं असू शकलं असतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेला कुठेही मनसे फॅक्टर महागात
वॉर्ड 60
शिवसेनेची प्रतिष्ठेची जागा : स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे 500 मतांनी हरले
भाजपचे उमेदवार योगिराज दाभाडकर जिंकले
मनसेच्या प्रशांत राणेंना याच प्रभागात 539 मते मिळाली
वॉर्ड 63
शिवसेनेच्या वर्षा कोरगांवकर 700 मतांनी पराभूत
भाजपच्या रंजना पाटील विजयी
मनसेच्या मीना वासवानींना 400 मते मिळाली
वॉर्ड 68
काँग्रेसमधून सेनेत गेलेले देवेंद्र आंबेरकर दोन हजार मतांनी हरले
भाजपचे रोहन राठोड जिंकले
या प्रभागात मनसेच्या सचिन तळेकरांना 784 मतं पडली
वॉर्ड 80
शिवसेनेचे मनोहर पांचाळ 2000 मतांनी हरले
भाजपचे सुनील यादव विजयी
मनसेच्या विशाल हळदनकर यांना 1200 मतं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement