एक्स्प्लोर
Advertisement
अग्नितांडवानंतर अनधिकृत बांधकामांवर हातोडा, बीएमसीची कारवाई
लोअर परळच्या कमला मील आणि वरळीच्या रघुवंशी मिलमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : 2018 च्या नव्या वर्षात जास्तीत जास्त अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याचा चंग मुंबई महापालिकेने बांधलाय. कमला मिलच्या अग्नितांडवात 14 निष्पापांचा बळी गेल्यावर महापालिकेला जाग आली आहे. लोअर परळच्या कमला मील आणि वरळीच्या रघुवंशी मिलमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील उपाहरगृह आणि हॉटेल्समधील अनधिकृत / बेकायदेशीर बाबींची तपासणी करण्याचे आणि त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व 24 विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना काल दिले होते.
त्यानुसार महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये विशेष चमूंचे गठन करुन त्याद्वारे उपहारगृह, हॉटेल्स, मॉल्स इत्यादींमध्ये मोहिमस्वरुपात तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान आढळून येणारी अनधिकृत वा वाढीव बांधकामं तात्काळ तोडण्यात आली आहेत.
कारवाई दरम्यान तपासणी करण्यात आलेल्या 624 ठिकाणांपैकी अनियमितता / अनधिकृत बांधकामं आढळून आलेल्या 314 ठिकाणी तोडकाम कारवाई करण्यात आली. तर 7 उपहारगृहे सील करण्यात आली आहेत. त्याचबरोबर 417 पेक्षा अधिक सिलिंडर देखील आजच्या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आले आहेत.
कमला मिलमधील 'मोजोस् बिस्रो' आणि '1 अबव्ह' या हॉटेलांना गुरुवारी रात्री आग लागली होती. यामध्ये 14 जणांचा होरपळून/गुदमरुन मृत्यू झाला. त्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईसाठी तातडीने हालचाली केल्या आहेत. मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई देखील सुरु करण्यात आली आहे.
1 अबव्ह पबला गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं.
‘मी परवाच इथे आलो होतो, तेव्हाच आगीची भीती व्यक्त केली होती’
आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
संबंधित बातम्या -
1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान
हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री
कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित
भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील
कमला मिल आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा!
कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!
कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक'
कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर...
कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली
मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू
मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement