(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोरगरीबांच्या हक्काच्या सरकारी तांदळाचा काळाबाजार, 18 जणांची टोळी पकडली
गोरगरीबांच्या हक्काच्या तांदळाचा काळाबाजार करणारी 18 जणांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे.त्यांच्याकडून महाराष्ट्र , कर्नाटकमधील सरकारी वाटपाचा 340 मेट्रिक टन तांदळाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
नवी मुंबई : सर्वसामान्य गोरगरीबांना पुरवण्यात येणारा रेशनिंगचा सर्वात मोठा काळा बाजार नवी मुंबई पोलिसांनी समोर आणला आहे. कोविड काळात गरीब जनतेला पुरवण्यात येणारा रेशनिंगचा तांदूळ थेट त्यांना न देता साऊथ आफ्रीकन देशात निर्यात करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. 340 मेट्रिक टन साठा जप्त करण्यात आला असून कर्नाटक मधील टोळीचाही यात सहभाग असल्याचे समोर आले आहे.
हा सर्व रेशनिंगचा तांदूळ कर्नाटक, हरियाणा आणि महाराष्ट्र् राज्यातून आणण्यात आला होता. आतापर्यंत नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने 340 मेट्रीक टन तांदूळ जप्त केला आहे. तसेच गेल्या आठ महिन्यात 32 हजार 827 मेट्रीक टन तांदूळ या साऊथ आफ्रीकन देशात निर्यात केला असून त्याची किंमत ८० कोटींच्या घरात आहे. या प्रकरणात आतापर्यंत 18 आरोपी निष्पन्न झाले असून कर्नाटकमधून तीन जणांना नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे.
Ration Black Marketing | सोलापुरातील बार्शीत रेशन घोटाळा उघड, पोलिसांची कारवाई, इतर दुकानांची
सरकार गरीबांसाठी पाठवत असलेले तांदूळ ही टोळी रेशनिंगच्या दुकानातून मिळवत असे. कोरोना काळात बायोमेट्रीक पद्धत बंद केल्याने ही बाब आरोपींच्या पथ्यावर पडली होती. दुसरीकडे कोरोनाकाळात गोरगरीबांना वाटण्यासाठी जास्त तांदूळ सरकारने दिले होते. हा सर्व तांदूळ काळाबाजार करून कर्नाटकमधून महाराष्ट्रतील गोडाऊनमध्ये आणला जात होता आणि नंतर दुसऱ्या गोणींमध्ये भरून तो आफ्रीकन देशात निर्यात केला जात होता.
नवी मुंबई पोलिसांनी प्रथम पनवेल पळस्पे येथील टेक केअर लॉजिस्टिक मधून तांदूळ जप्त केला. त्यानंतर भिवंडीमधून जय आनंद फुड कंपनी मिरांडे इंडस्ट्री, खालापूर मधून झेनिथ इम्पाक्स कंपनी आणि जय फूड प्रोडक्शन कंपनी मधून तब्बल 91 लाख रुपये किमतीचा तांदूळ जप्त केला आहे. आरोपींनी अफ्रिकन देशात गेल्या 8 महिन्यात 31 हजार 827 मेट्रिक टन तांदूळ निर्यात केला असल्याचे तासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 18 जणांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.