एक्स्प्लोर

बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवत आहात का?, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल 

शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबत युतीत सडलो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं होतं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी जोरदार टीका केलीय. 

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल पुन्हा भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधताना त्यांनी पुन्हा शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबत युतीत सडलो असा पुनरुच्चार केला होता. यावर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी भाष्य केलं असून त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलीय. 

फडणवीस म्हणाले की,  काल उद्धव ठाकरे यांनी युतीत सडलो असं वक्तव्य केलं. 2012 पर्यंत बाळासाहेब ठाकरे युतीत होते.  त्यांच्या हयातीत युती कायम ठेवली. बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवत आहात का? असा संशय आमच्या मनात येतोय, असं फडणवीस म्हणाले. 
 
तुमचा पक्ष जन्माला यायच्या आधी आमचा मुंबईत नगरसेवक होता, आमदार होते

फडणवीस म्हणाले की, तुमचा पक्ष जन्माला यायच्या आधी आमचा मुंबईत नगरसेवक होता, आमदार होते. भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणुक शिवसेनेने लढवली. मनोहर जोशी भाजपच्या चिन्हावर लढले होते.  भाजपच्या सोबत असताना एक नंबर वर होते आणि आता चार नंबरवर आले.  म्हणजे लक्षात घ्या कुणाबरोबर कोण सडलं, असं फडणवीस म्हणाले. 

तुमचं हिंदुत्व हे भाषणातलं कागदावरचं
फडणवीस म्हणाले की राम जन्मभूमीच्या आंदोलनात लाठ्या काठ्या खाणारे आम्ही होतो तुम्ही तोंडाच्या वाफा घालवत आहेत.  राम मंदिर मोदींनी करून दाखवला.  तुम्ही दुर्गाडीचा प्रश्न तरी सोडवा. तुमचं हिंदुत्व हे भाषणातलं कागदावरचं आहे. औरंगाबाद, उस्मानाबादचं नाव बदललं नाही, प्रयागराज नाव बदलून दाखवलं असं ते म्हणाले. ते म्हणाले की, काल आम्ही बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ट्वीट केलं, पण गांधी कुटुंबियांनी हे ट्वीट केलं का? याला लाचारी म्हणतात, असं फडणवीस म्हणाले. 

त्यांनी पुढं म्हटलं की, उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणांमध्ये राज्याचं हित काही नाही. त्यांच्याकडे बोलायला काही नाही. भारतीय जनता पार्टी आपलं सरकार बनवेल, आम्ही अजुनही एक नंबर आहेत, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, ते असं म्हणताहेत की, बाबरीनंतर शिवसेनेची लाट होती. त्यावेळी उत्तर प्रदेशात शिवसेनेचे 180 उमेदवार लढले होते त्यापैकी 179 उमेदवारांचं डिपॅाजिट जप्त झालं होतं.  तुम्हाला जनतेनं तेव्हाही नाकारलं होतं. कारण राम मंदिराच्या आंदोलनात कारसेवक होते, असं ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

भाजपनं ईडी, आयटी, सीबीआयची वर्दी उतरवून मैदानात यावं, गाडल्याशिवाय राहणार नाही : संजय राऊत 

शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबतच्या युतीमध्ये सडली, मुख्यमंत्री ठाकरेंचा पुनरुच्चार

गाफील शिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंनी कान उपटले, सेनेच्या बड्या नेत्यांनीही प्रचारात उतरावं, ठाकरेंचं मत

हे देखील वाचा- 
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget