एक्स्प्लोर

शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबतच्या युतीमध्ये सडली, मुख्यमंत्री ठाकरेंचा पुनरुच्चार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबत युतीत सडली, असा पुनरुच्चार केला आहे.

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल पुन्हा भाजपवर (BJP) हल्लाबोल केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संवाद साधताना त्यांनी पुन्हा शिवसेनेची 25 वर्ष भाजपसोबत युतीत सडलो असा पुनरुच्चार केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेनेची गेली 25 वर्ष भाजप सोबत युती होती. आपली 25 वर्ष युतीमध्ये सडली. माझं आजही तेच मत आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे. बाळासाहेब म्हणायचे की राजकारण हे गजकर्णासारखं आहे, जेवढं खाजवावं तेवढी अधिक खाज येतं. तसे हे सगळे गजकर्णी, म्हणजे राजकारणातले, नाहीतर पुन्हा एकदा मथळा यायचा की मी त्यांना गजकर्णी म्हटलं. मी त्यांना राजकारणाचं गजकरण आहे, म्हणून मी बोलतोय, असा टोलाही त्यांनी लगावला. बाळासाहेबांचं दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न येत्या काळात पूर्ण करणार, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.

...तर आज आपला पंतप्रधान असता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, यांना हिंदुत्वासाठी सत्ता हवी होती. वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापि दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलेलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. बाबरी मशीद पडल्यानंतर देशात शिवसेनेची लाट होती. बाबरी मशीद पडल्यानंतर शिवसेनेनं सिमोल्लंघन केलं असतं तर आज आपला पंतप्रधान असता, असंही ते म्हणाले.

आपण शिवसेनेची लाट का आणू शकत नाही?

उद्धव ठाकरे म्हणाले की, "फेब्रुवारीत भेटलो होतो. त्यावेळी आपण राज्यभर शिवसंपर्क मोहिम राबवायचं ठरवलं होतं. पण कोरोनाची दुसरी लाट आली. आतासुद्धा दिवाळीच्या सुमारास राज्यभर फिरायचं, सगळ्यांचं दर्शन घ्यायचा विचार करत होतो पण थोडं माझं मानेचं दुखणं वर आलं. माझी शस्त्रक्रिया करावी लागली. कोरोनाच्या लाटेमागून लाटा येऊ शकतात. आपण शिवसेनेची लाट का आणू शकत नाही? व्हायरस त्याची लाट एकामागे एक आणत असेल तर आपण शिवसेनेची लाट का आणू शकत नाहीत? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

लवकरात लवकर बाहेर पडणार, महाराष्ट्र पिंजून काढणार
"शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांनी लावलेल्या वृक्षाचे फळं आपण चाखत आहोत. आज आपण प्रत्यक्ष भेटत नसलो तरी तंत्रज्ञानामुळे भेटतच आहोत. आपल्याला कुणी अडवू शकत नाही. आज मी तुमच्यासमोर खूप दिवसांनी आलेलो आहे. मधले दोन महिने उपाचारात गेलो. मी लवकरात लवकर बाहेर पडणार. महाराष्ट्र पिंजून काढणार. तुमच्यासोबत तुमच्या साक्षीने भगव्याचं तेज आहे, जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार आहे. जसं काळजीवाहू सरकार असतं तसं काळजीवाहू हे विरोधक आहेत. स्वत:च स्वत:च्या काळजीने त्यांचा अंत होणार आहे", असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 

महाराष्ट्राबाहेर निवडणूक लढणार
एकट्यानं लढा म्हणायचं आणि सत्तेचा गैरवापर करायचा. हरलो तरी घरी घाबरायचं नाही, बघू किती दिव हरणार. पण आता लढणार. महाराष्ट्राबाहेर देखील आपण निवडणूक लढवायची.राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेच्याही बड्या नेत्यांनी प्रचारात उतरावं. सत्तेचा कसा वापर अधिक कसा करता येईल, याचा विचार करा आणि काम करा. हातात बळ नसेल, तर एकहाती सत्ता शक्य नाही. वाघ असाल तर बंगालच्या वाघिणीसारखं लढायला शिका. सत्तेचा वापर अधिक कसा करता येईल याचा विचार करा आणि काम करा, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 

हे देखील वाचा- 
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Lok Sabha 2024 : लोकसभेसाठी बड्या नेत्यांचे अर्ज दाखल, शक्तिप्रदर्शनही जोरातSpecial Report BJP Lok Sabha 2024 : लोकसभेच्या परीक्षेसोबत भाजपची विधानसभेची रिहर्सलSpecial Report Mahayuti : शिंदेंच्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव : नवलेJob Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 18 April 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
Sharad Pawar: बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
बैल म्हातारा झाल्यावर... 20 वर्षांपूर्वी टोकाची टीका अन् आता शरद पवार 'त्या' जुन्या विरोधकाला भेटले
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
Embed widget