भाजपनं ईडी, आयटी, सीबीआयची वर्दी उतरवून मैदानात यावं, गाडल्याशिवाय राहणार नाही : संजय राऊत
भाजपनं ईडी, आयटी, सीबीआयची वर्दी उतरवून मैदानात यावं त्यांना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं म्हणत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा भाजपवर (BJP)निशाणा साधला आहे.
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा भाजपवर (BJP)निशाणा साधला आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे काल जनतेसमोर आले, ते बोलतायत हे पाहूनच विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. भाजपच्या विरोधात शिवसेनेनं आता महाराष्ट्राच्या बाहेरही लढायचं ठरवलं आहे, असं राऊत म्हणाले. त्यांनी यावेळी म्हटलं की, आम्हाला लगेच कदाचित यश मिळणार नाही, पण उद्या नक्की मिळेल. भाजपनं ईडी, आयटी, सीबीआयची वर्दी उतरवून मैदानात यावं त्यांना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं राऊत म्हणाले.
भाजपला शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये जमीनीपासून आकाशापर्यंत नेल्याचं सांगताना ठरवलं असतं तर आज देशात शिवसेनेचा पंतप्रधान असता असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपला आम्ही महाराष्ट्रामध्ये जमीनीवरुन आकाशापर्यंत पोहचवलं, हे सर्वांना माहितीय. आम्ही युतीचा धर्म कायम पाळला. इतिहास याला साक्ष आहे. काल उद्धव ठाकरेंनी आपली खंत व्यक्ती केली ती योग्य आहे, असंही राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले की, ही केवळ शिवसेनेची गोष्ट नाहीय. तर जे चांगल्या हेतूने भाजपासोबत गेलेत त्या सर्व पक्षांचे हेच हाल झाले आहेत. अकाली दल असो, गोव्यात एमजीपी असो किंवा हरियाणा असो, चंद्रबाबू नायडू असो, जयललिता असो सर्वांना त्याची किंमत चुकवावी लागलीय. मात्र शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे ज्याने त्यांना किंमत चुकवावी लागेल असं काम केलंय, असं त्यांनी म्हटलं आहे.
राऊत म्हणाले की, एक हिंदू पार्टी देशात वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यात अडचण ठरणार नाही अशी बाळासाहेबांची भूमिका होती. आम्ही एका विचारसणीचे लोक आहोत. तुम्ही मोठे असो आम्ही छोटे असो विचार वाढत राहिला पाहिजे, असाच बाळासाहेबांचा कायम विचार राहिला, असंही राऊत म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या
आज बाळासाहेब असते तर विरोधी पक्षांमधील कावकाव, चिवचिव थंड पडली असती : संजय राऊत
भाजपच्या बेताल माकडचेष्टा पाहून बाळासाहेब काय म्हणाले असते? 'रोखठोक'मधून संजय राऊत म्हणतात...