एक्स्प्लोर
बीएमसीसाठी 110 जागा दिल्या तरच भाजपची शिवसेनेशी युती : सूत्र
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 100 पेक्षा कमी जागा दिल्यास युती करणार नाही, असं भाजपने सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पण 227 जागांच्या मुंबई महापालिकेत 110 जागांची मागणी भाजप करत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या विभागप्रमुखांनी तयार केलेल्या अंतर्गत अहवालात भाजपला 80 जागा देण्याचा उल्लेख केला आहे. पण ही 30 जागांची तफावत फारच असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.
भाजप 110 जागांवर अडल्यामुळे महापालिकेत काय फॉर्म्युला तयार होणार, कशी सेटलमेंट होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान मुंबई महापालिकेच्या दालनात 2 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरेंच्या तैलचित्राचं उद्घाटन होणार आहे. यावेळी जागावाटपाची कोंडी फुटू शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement