एक्स्प्लोर
Advertisement
टोईंगमध्ये मोठा घोटाळा, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे IAS दराडेंशी लागेबंध : निरुपम
“प्रवीण दराडे जिथे जिथे गेले, तिथे तिथे विदर्भ इन्फोटेकला सरकारी काम मिळत गेली. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून या कंपनीला अधिक फायदा होत गेला.”, असा आरोप निरुपम यांनी केला.
मुंबई : मुंबईतल्या टोईंगमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. आयएएस अधिकारी प्रवीण दराडे यांच्याशी संबंधित असलेल्या विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला कंत्राट देण्यात आलं आहे, असा आरोपही निरुपम यांनी केला आहे.
“प्रवीण दराडे जिथे जिथे गेले, तिथे तिथे विदर्भ इन्फोटेकला सरकारी काम मिळत गेली. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून या कंपनीला अधिक फायदा होत गेला.”, असा आरोप निरुपम यांनी केला.
“टोईंग कंपन्या बेदरकारपणे गाड्या टोईंग करत आहेत. मुंबईतील वाहन टोईंग करण्याचं काम नागपूरस्थित विदर्भ इन्फोटेक कंपनीला मिळालं आहे. टोईंगचा दंड 150 वरुन 660 का करण्यात आला? दर टोईंगमागे 400 रुपये या एजन्सीला मिळतात.”, असा गंभीर आरोपही निरुपम यांनी केला.
“विदर्भ इन्फोटेक कॉम्प्युटर सोल्युशन कंपनी आहे. त्यांना टोईंगच्या कामाचा अनुभव नाही. विदर्भ इन्फोटेक कंपनीला कामाचा अनुभव नसताना टोईंगचं काम का देण्यात आलं? विदर्भ इन्फोटेकला वरळीत आरटीओ कार्यालयात 1 हजार स्केअर फुटांचं कार्यालय फुकट का दिले?” असा सवाल करत निरुपमांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीचीही मुख्यमंत्र्यांकडे केली.
“प्रवीण दराडे आणि विदर्भ इन्फोटेक यांचे जवळचे संबंध आहेत. दराडे मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत. प्रवीण दराडे मुख्यमंत्र्यांसाठी इतके प्रिय आहेत की ते पहिले IAS अधिकारी आहेत ज्यांना मलबार हिल येथील एक बंगला सेवानिवृत्तीपर्यंत देण्यात आला आहे.” असाही गंभीर आरोप निरुपम यांनी केला.
मुख्यमंत्री सचिवालयाकडून स्पष्टीकरण
"या संपूर्ण प्रक्रियेशी मुख्यमंत्री कार्यालय आणि प्रवीण दराडे यांचा काहीच संबंध नाही. ही संपूर्ण प्रक्रिया सहआयुक्त आणि मुंबई वाहतूक पोलिसांच्या पातळीवरच निश्चित करण्यात आली आहे. विदर्भ इन्फोटेकला काम दिल्यानंतर महाराष्ट्र टोईंग असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्तांकडून अहवालही मागितला आहे. शिवाय हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून कोर्टातच राज्य सरकारतर्फे भूमिका मांडली जाईल." - जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
क्राईम
Advertisement