एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत बंद नव्हे, उद्धव ठाकरेंचा दुटप्पीपणा दिसला: राणे
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी मुंबईत भारत बंदचा परिणाम दिसला नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
भारत बंद नवी दिल्ली: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीविरोधात देशभरात आंदोलनं सुरु आहेत. त्यावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी मुंबईत भारत बंदचा परिणाम दिसला नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
मुंबईत बंदचा परिणाम दिसला नाही, पण उद्धव ठाकरेंची पुन्हा दुटप्पी भूमिका पाहायला मिळाली. शिवसेना पेट्रोल भाववाढीवर बोलते. एकीकडे महागाईवर बोलायचं पण दुसरीकडे सत्तेला चिटकून राहायचं, यामधलं सातत्य आज दिसलं आहे, असा टोला राणेंनी लगावला.
शिवसेना नेहमीच कोलांट्याउड्या मारते. दुटप्पी भूमिका म्हणजे शिवसेना. महागाईसाठी जेवढी भाजप जबाबदार आहे तेवढीच शिवसेनाही जबाबदार आहे. कारण केंद्रात आणि राज्यात दोघेही सत्तेत आहेत. सत्तेत असताना विरोध करतात, मग आज बंदमध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं. पण तसं झालं नाही, याचं कारण सत्ता आहे, असं टीकास्त्र नारायण राणे यांनी सोडलं.
‘इंधन दर आमच्या हातात नाहीत’
केंद्र सरकारने इंधनाचे दर आमच्या हातात नाहीत, असं म्हटलंय. केंद्रीय कायदेमंत्री आणि भाजप नेते रवीशंकर प्रसाद यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली.
रवीशंकर प्रसाद म्हणाले, “सध्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र ही अशी समस्या आहे, ज्याचं नियंत्रण आमच्या हातात नाही.
पेट्रोलचे दर कमी व्हायलाच हवेत. आम्ही त्यावर काहीतरी उपाय काढू. पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर आमचं नियंत्रण नाही. अनेक देशांनी उत्पादन मर्यादित केलं आहे. व्हेनेज्युएलामध्ये अस्थिरता आहे, अमेरिकेत गॅस उत्पादन अद्याप सुरु झालेलं नाही, तर अमेरिकेने इराणवर बंदी घातली आहे. त्यामुळे जगभरात इंधनाची मागणी आहे, त्या तुलनेत पुरवठा कमी आहे. आम्ही बचाव करत नाही तर आम्ही जनतेसोबत आहोत. आमच्या सरकारच्या काळात पेट्रोल दर कमीही झाले आहेत आणि वाढलेही आहेत. ही अशी समस्या आहे, ज्यावरचा उपाय आमच्या हातात नाही”
भारत बंद
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेनेही पाठिंबा दिला आहे. तर देशभरातील अनेक प्रादेशिक पक्षांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. आज सकाळपासूनच विविध भागात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शांततेच्या मार्गाने आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान होऊ न देता आंदोलन करण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.
संबंधित बातम्या
इंधन दर आमच्या हातात नाहीत: रवीशंकर प्रसाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement