Bhandara Hospital Fire | सुमारे 21 मिनिटे धुरामुळे निष्पाप बाळं ओरडत होती, रडत होती; फॉरेन्सिक टीमला मिळालेल्या CCTV फुटेजमधून स्पष्ट
फॉरेन्सिक विभाग सीसीटीव्ही फुटेजचा डेटा मिळवण्यात यशस्वी झाला आहे. हा व्हिडिओ एसएनसीयूच्या आतील आहे, ज्यामधून स्पष्ट होते की खोलीत आग होती तेव्हा 21 मिनिटांपर्यंत कोणीही खोलीत आत दिसत नाही.
मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणात चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला मात्र स्थानिक पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांना फॉरेन्सिक विभागाच्या (एफएसएल) काही अहवालांची प्रतीक्षा आहे. एफएसएलने पोलिसांकडून मिळालेल्या डीव्हीआरमध्ये एक सीसीटीव्ही फुटेज मिळवलं आहे. ज्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्टपणे दिसत आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना दुपारी 1:40 च्या सुमारास ही घटना घडली. हे सीसीटीव्ही फुटेज त्या खोलीचे आहे जिथे 10 मुले भाजली होती. सीसीटीव्ही फुटेजनुसार धुरामुळे बालके सुमारे 21 मिनिटे ओरडत राहिली. परंतु त्यांना वाचविण्यासाठी कोणीही खोलीत आले नाही. त्याशिवाय रुग्णालयातला कोणताही कर्मचारी त्या खोलीत हजर नव्हता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ऑडिओही रेकॉर्ड झाला होता ज्यात सुमारे 21 मिनिटे धुरामुळे निष्पाप बाळं ओरडताना, रडताना दिसत आहेत. भंडारा आग दुर्घटना : डॉक्टरांवर झालेली कारवाई मान्य नाही, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, पालकांची मागणी
सूत्रांच्या माहितीनुसार, कालिना येथील राज्य संचालक फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने आपल्या अहवालात रुग्णालयाच्या गंभीर दुर्लक्षाचे संकेत दिले आहेत. त्यानंतर भंडारा पोलिसांनी आणखी काही डीव्हीआर पाठवून काही प्रश्नांची उत्तरे विचारली आहेत. या घटनेनंतर भंडारा पोलिसांनी रुग्णालयाचे तीन डिजीटल व्हिडिओ रेकॉर्डर म्हणजेच डीव्हीआर कलिना एफएसएल पाठवले होते. एसएनसीयूच्या आत आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज पोलिसांना हवे होते जेथे 10 नवजात मुलांचा मृत्यू झाला होता.
भंडारा रुग्णालय आग : अनेक माता-पित्यांनी पोटच्या बाळांना मनभरून पाहिलंही नव्हतं
फॉरेन्सिक विभाग सीसीटीव्ही फुटेजचा डेटा मिळवण्यात यशस्वी झाला आहे. हा व्हिडिओ एसएनसीयूच्या आतील आहे, ज्यामधून स्पष्ट होते की खोलीत आग होती तेव्हा 21 मिनिटांपर्यंत कोणीही खोलीत आत दिसत नाही.
भंडारा रुग्णालय आग : दिवस उजडताच दुःखद बातमी मिळाली अन् आईच्या पायाखालची जमीन सरकली!
एफएसएलला प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही अहवालानुसार महाराष्ट्र पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आग लागण्याच्या वेळी नर्स तिच्या नर्सिंग स्टेशनमधून गायब असल्याचे स्पष्ट दिसत आहे. रुग्णालयाच्या इतर कर्मचार्यांनाही आगीची माहिती जवळपास 21 मिनिटांनंतर समजली. कामाच्या ठिकाणी नर्सची अनुपस्थिती रुग्णालयाचा बेजबाबदारपणा सिद्ध करतो. या प्रकरणात एफएसएल आपला दुसरा अहवाल या आठवड्याच्या अखेरीस सादर करण्याची शक्यता आहे.