एक्स्प्लोर

भंडारा आग दुर्घटना : डॉक्टरांवर झालेली कारवाई मान्य नाही, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, पालकांची मागणी

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेली कार्यवाही आम्हाला मान्य नाही. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सोबतच न्यायालयीन चौकशी करा, मृत मुलांच्या पालकांची मागणी.

भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेली कार्यवाही आम्हाला मान्य नाही. दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी मृत मुलांच्या पालकांनी केली आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 9 जानेवारीला मध्यरात्री नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत 10 नवजात बाकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी रुग्णालयातील दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भंडारा जिल्हा भाजपतर्फे 15 जानेवारीपासुन भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे. काल (21 जानेवारी) आलेल्या अहवालात रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक आणि डॉकटरांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली तर निवासी वैधकीय अधिकारी यांची बदली करण्यात आली. तर कंत्राटी तत्वावर सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि नर्सवर सेवामुक्तीची कार्यवाही करण्यात आली आहे. या कार्यवाहीने मृत कुटुंबियाना न्याय मिळणार नाही. तर दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे आणि मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Bhandara hospital fire case : भंडारा आगप्रकरणी सिव्हिल सर्जनसह तिघे निलंबित, तिघे सेवामुक्त : आरोग्यमंत्री राजेश टोपे

तर दुसरीकडे याच जिल्हा सामान्य रुग्णालयातील 41 डॉक्टरांपैकी 27 लोक एनपीए भत्ता घेत नसून शाशकीय सेवेसह भंडारा शहरात खाजगी रुग्णालये चालवितात. त्यामुळे बरेच लोक रुग्णालयाच्या कार्यालयीन वेळेवर रुग्णालयात हजर राहत नसल्याने अशा पद्धतीच्या घटना घडतात. त्यामुळे एनपीए भत्ता न घेणाऱ्या डॉक्टर रुग्णालयातील कार्यलयीन वेळेत उपलब्ध असतात कि नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

अशी झाली कारवाई भंडारा रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल काल रात्री उशीरा आला. यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली, असं टोपेंनी सांगितलं.

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका, कुणावर काय कारवाई डॉ प्रमोद खंडाते, सिव्हिल सर्जन - निलंबित डॉ. सुनीता बडे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन - बदली अर्चना मेश्राम, वैद्यकीय अधिकारी - निलंबित सुशील अंबडे, बालरोग तज्ञ - सेवा समाप्त ज्योती भारस्कार, नर्स इनचार्ज - निलंबित स्मिता आंबीलडुके, स्टाफ नर्स - सेवा समाप्त शुभांगी साठवणे, स्टाफ नर्स - सेवा समाप्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget