भंडारा रुग्णालय आग : अनेक माता-पित्यांनी पोटच्या बाळांना मनभरून पाहिलंही नव्हतं
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आगीत होरपळून 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.या घटनेत मृत्यू झालेल्या आपल्या बाळांना अनेक माता-पित्यांनी डोळेभरुन पाहिलंही नव्हतं.
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) काल (9 जानेवारी) मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे 10 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. यात आपल्या पोटच्या मुलांना मनभरून पाहण्याची संधीसुद्धा अनेक पालकांच्या नशिबी आली आहे. त्यातीलच एक म्हणजे भंडारा जिल्ह्याच्या भोजापूर गावातील विश्वनाथ आणि गीता बोहेरे.
अडीच वर्षाआधी गीता आणि विश्वनाथ यांचे लग्न झाले आणि 10 नोव्हेंबरला गीताने भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, मुलीचे वजन कमी असल्याने तिला 10 नोव्हेंबरला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय दाखल करण्यात आले. गीता आपल्या मुलीला रोज स्थनपान करायला रुग्णालयात यायची. कालही तिने संध्याकाळी 4 वाजता आपल्या मुलीला शेवटचे बघितले आणि स्थनपान केले. मात्र, आज पहाटे गीताला रुग्णालयातून फोन आला की तुमची मुलगी दगावली.
Photo : भंडाऱ्याच्या SNCUत कालपर्यंत जिथं ऐकू यायच्या किलकाऱ्या, तिथं आता भयाण शांतता!
ही बातमी गीताच्या कुटुंबियांना माहिती होताच सर्व सुन्न झाले. गीताचे पती यांनी आपल्या मुलीला दोन महिन्याआधी पहिल्यांदा जन्म घेतला त्यावेळी पाहिले होते तर आज दोन महिन्यानंतर मृत अवस्थेत बघितले असून ते देखील सून्न झाले. मात्र, रुग्णालयात आग लागली तेव्हा एसएनसीयु युनिटमध्ये डॉक्टर किंवा नर्स नसल्यामुळे माझ्या मुलीचा जळून मृत्यू झाला आहे. याला रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचे बोहेरे कुटुंबियांनी म्हटले असून दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी बोहेरे कुटुंबियांनी केली आहे.
Bhandara Hospital Fire चौकशी पूर्ण झाल्यानंतर रिपोर्टच्या आधारावर कारवाई करू-आरोग्यमंत्री राजेश टोपे