एक्स्प्लोर
इमारतीबाहेर तिसऱ्या मजल्यावर चढून तरुणाचा तलवार हल्ल्याचा प्रयत्न

वसई : पुण्यातील मायलेकींना कुत्र्याच्या पिल्लावरुन झालेल्या मारहाणीचं प्रकरण ताजं असतानाच मुंबईजवळच्या भाईंदरमध्ये एक भयावह प्रकार समोर आला आहे. दोन कुटुंबातील वादानंतर एका तरुणाने तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. भाईंदर पश्चिममधील प्लॅनेटोरिया या इमारतीतील दोन कुटुंबांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वादावादी झाली. या वादानंतर एका कुटुंबातील संतप्त युवकाने थेट तलवार काढली. विशेष म्हणजे इमारतीबाहेरुन हा युवक तळमजल्यावरुन तिसऱ्या मजल्या पर्यंत चढत गेला. फ्लॅट क्रमांक 304 च्या खिडकीबाहेरुन तरुणाने तलवारीने वार केले. हा सगळा प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. व्हिडिओ खिडकीची काच फुटल्याचं दिसत आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही. दरम्यान, भाईंदर पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई केली जात आहे.
आणखी वाचा























