बीडीडी चाळीतील हवालदाराच्या लेकाचं ऑलिम्पिकचं स्वप्नं; एबीपीच्या बातमीनं पोहणाऱ्या हातांना मदतीचा हात सरसावला
घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं कधी कधी त्याला सरावासाठी मागे पडावं लागतं. त्यामुळे त्याच्या वडिलांकडून हळहळ व्यक्त केली जातेय.
मुंबई : नुकतीच पॅरिस ऑलम्पिक स्पर्धा पार पडली. यात भारतातील खेळाडूंनी अथक मेहनत घेत चांगली कामगिरी केली, तर काही खेळाडूंनी पदके देखील मिळवली असून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय. मुंबईतील बीडीडी चाळीतील एका हवालदाराचा मुलगा ऑलम्पिकचे स्वप्न पाहत मेहनत घेतोय. त्याचं नाव म्हणजे ओम साटम.. ओम सध्या स्विमर ऑलिम्पिकसाठी तयारी करतोय. मात्र घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं कधी कधी त्याला सरावासाठी मागे प़डावं लागतं. त्यामुळे त्याच्या वडिलांकडून हळहळ व्यक्त केली जातेय. दरम्यान ही बातमी माझा नं दाखवल्यानंतर क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी स्विमर ओम साटमची भेट घेतलीय. तसंच ॲालिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक मदत करणार असल्याचंही संजय बनसोडे यांनी सांगितलंय. तसंच शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी ओम साटमची भेट घेऊन त्याला शुभेच्छाही दिल्या.
मुंबईतील वरळी बीडीडी चाळ.. या चाळीत मुंबईला सुरक्षा पुरवणारे अनेक पोलीस बांधव दाटी वाटीत छोट्याशा घरात राहतात. यातच प्रवीण साटम नावाचे मुंबई पोलिसातील एक हेड कॉन्स्टेबल आहेत . एक मुलगा, मुलगी आणि पत्नी अस साटम यांचं कुटुंब आहे. दहा बाय बाराच्या खोलीत गेल्या अनेक वर्षांपासून ते राहत आहेत. याच घरातून त्यांचा मुलगा ओम साटम हा आपल्या स्विमिंग खेळातून सध्या सर्वत्र आपली छाप पाडत आहे. जिल्हा पातळीपासून राष्ट्रीय स्तरावर स्विमिंग मध्ये ओम ने साधारण पाचशेच्या आसपास मेडल आणि प्रमाणपत्र मिळवत नाव कामावले आहे. तो सध्या 2028 ला होणाऱ्या ऑलिम्पिकबरोबर इतर स्पर्धांची तयारी करतोय
वरळीतील बीडीडी चाळ ही अनेकदा यांना त्या कारणास्तव चर्चेत असते. मात्र याच बीडीचाळीत दहा बाय बाराच्या खोलीत राहणारा हा 16 वर्षीय ओम साटम स्विमिंग मध्ये विविध पराक्रम करत, देशाचं नाव, राज्याचं आणि मुंबईचं नाव मोठं करण्यासाठी खूप कष्ट घेत आहे. त्याला नुकताच राज्य सरकारचा क्रीडा पुरस्कार आणि स्कॉलरशिप देखील मिळाली आहे.सध्या तो अकरावीत, रिझवी कॉलेज येथे शिकत असून स्विमिंग चे प्रशिक्षक सौरव सांगवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे गिरवत आहे. मात्र ओम ची परिस्थिती ही हालाखीची आहे. एक हवालदार असल्याने घरासहित ओमला लागणारा खर्च पूर्ण करण्यासाठी त्यांची फार अडचण होतेय.
पैशाअभावी ओमची प्रॅक्टिस पडली मागे
अनेक खेळाडूंच आपले करिअर करत असताना ऑलम्पिक आणि इतर स्पर्धांचे स्वप्न असते. त्यानुसार प्रत्येक प्लेअर हा त्यानुसार मेहनतीना प्रॅक्टिस करत असतो. मात्र अनेकदा आपण पाहिले आहे पैशाअभावी खेळाडूंची प्रॅक्टिस मागे पडते. अशीच परिस्थिती सध्या ओम साटमची देखील आहे. जास्त वेळ त्याला प्रॅक्टिस मिळत नाहीये, प्रॅक्टिस करताना त्याला अडचणी आहेत. त्यामुळे त्याचे बाबा प्रवीण साटम मुलांच्या स्वप्नांसाठी हळहळ व्यक्त करतात.
राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचं स्वप्न
ओमला आईबाबा दोघेही मेहनत करत जनरल अरुण कुमार स्विमिंग पूल येथे प्रॅक्टिस देतात. तर अधिकची मेहनत करण्यासाठी ओम वरळी पोलीस स्विमिंग पूल येथे जातो.2028 लॉस एजंलीस, USA ऑलिम्पिक स्पर्धा, वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि काही राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचं त्याच स्वप्नं आहे.
ओम सारखेअनेक प्लेअर्स सध्या राज्यात विविध खेळाची तयारी करतायत. या खेळाडूंना वेळेवर राज्य सरकार असो केंद्र सरकार असो यांनी व इतर संस्थांनी मदत करायला हवी अशी भावना नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक मधील पदक विजेते स्वप्निल कुसाळे यांनी देखील एका कार्यक्रमात व्यक्त केलीय. ओमने आतापर्यंत कमी वयात शाळेचं मुंबईचं आणि राज्याचं नाव हे स्विमिंग मध्ये आपल्या चांगल्या कामगिरीने उंचावले आहे. मात्र पुढच्या स्पर्धांची तयारी करत असताना त्याला अनेक अडचणी पुढे आहेत.