एक्स्प्लोर
डोंबिवलीत बालाजीच्या लग्नाची लगबग सुरु, संध्याकाळी भव्य सोहळा
या लग्नाला वऱ्हाडी म्हणून कल्याण-डोंबिवलीकरांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
डोंबिवली : डोंबिवलीत आज संध्याकाळी तिरुपती बालाजीचा लग्नसोहळा होणार आहे. या सोहळ्याची लागबद सकाळपासूनच सुरु झाली आहे. आज सकाळपासून डोंबिवलीच्या हभप सावळाराम महाराज क्रीडासंकुलात या भव्य लग्नसोहळ्यापूर्वीचे कार्यक्रम सुरु झाले आहेत.
आज सकाळी सहा वाजल्यापासून तोमाला सेवा, कुंकुमार्जन, तुलाभार असे धार्मिक विधी करण्यात येत असून यासाठी तिरुपती बालाजी देवस्थानचे पुजारी उपस्थित आहेत. खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार सुभाष भोईर यांनी सकाळी सपत्नीक तिरुपती बालाजीची पूजा केली. या कार्यक्रमाला सकाळपासून कल्याण डोंबिवलीतल्या भाविकांनी गर्दी केली आहे. यानंतर आता दुपारी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून सायंकाळी 7 ते 9 या वेळेत लग्नाचा मुहूर्त असणार आहे.
या लग्नाला वऱ्हाडी म्हणून कल्याण-डोंबिवलीकरांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी प्रत्येक गोष्ट ही थेट तिरुपती बालाजी मंदिरातून आणण्यात आली आहे. कालच या सोहळ्यासाठी प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू तिरुपतीहून डोंबिवलीत दाखल झाले आहेत, तर सायंकाळी सात नंतर होणाऱ्या महाप्रसादासाठी 20 प्रकारचे पदार्थ तयार करणारे आचारीही खास तिरुपतीच्या प्रसादालयातून आले आहेत.
दरम्यान, या सोहळ्यासाठी डोंबिवली शहरात भव्यदिव्य आणि नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली असून देवदेवतांची चित्र, आणि इतर रोषणाई पाहण्यासाठी डोंबिवलीकर गर्दी करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement