एक्स्प्लोर
देशभरात बकरी ईदचा उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा
मुस्लीम बांधवांनी ठिकठिकाणी नमाज पठणासाठी गर्दी केली आहे. नमाजनंतर घरांमध्ये बोकडांची कुर्बानी देऊन सुन्नते इब्राहीमी अदा साजरी होईल.

मुंबई : जगभरातील मुस्लीमांचा आज पवित्र सण ईद-उल-जुहा अर्थात बकरी ईद आहे. यानिमित्ताने देशभरात आज उत्साह पाहायला मिळतोय. बकरी ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
मुस्लीम बांधवांनी ठिकठिकाणी नमाज पठणासाठी गर्दी केली आहे. नमाजनंतर घरांमध्ये बोकडांची कुर्बानी देऊन सुन्नते इब्राहीमी अदा साजरी होईल. त्यामुळे देशासह राज्यातही बकरी आणि बोकडांची मागणी वाढली आहे. परिणामी बाजारात बोकडांच्या किंमतीही वाढल्या आहेत. बकरी ईदच्या निमित्ताने बाजारपेठाही फुलल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना आजच्या दिवशी बकरी ईदनिमित्त सुट्टी असते.Best wishes on Id-ul-Zuha. May this day deepen the spirit of compassion and brotherhood in our society.
— Narendra Modi (@narendramodi) August 22, 2018
आणखी वाचा























