एक्स्प्लोर
Advertisement
स्काऊट-गाईड कॅम्पमध्ये डोंगरावरुन पडून विद्यार्थिनीचा मृत्यू
बदलापूरमधीस कात्रप शाळेच्या स्काऊट गाईडच्या कॅम्प दरम्यान डोंगरावरुन पडून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.
बदलापूर : शाळेच्या स्काऊट गाईडच्या कॅम्प दरम्यान ट्रेकिंग करताना डोंगरावरुन कोसळून एका विद्यार्थिनीला प्राण गमवावे लागले. दहावीत शिकणाऱ्या पूर्वा गांगुर्डेचा मृत्यू झाला. ती बदलापूरच्या कात्रप विद्यालयात शिकत होती.
कात्रप विद्यालयात शिकणाऱ्या नववी आणि दहावीच्या स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांचा कॅम्प कात्रप डोंगरावर गेला होता. सकाळी सात वाजताच्या सुमारास या विद्यार्थ्यांनी डोंगर चढायला सुरुवात केली. आठ वाजता डोंगराच्या माथ्यावर पोहचल्यानंतर त्यांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मात्र डोंगराच्या मध्यभागी असलेल्या तीव्र उतारावर पूर्वा आणि अपूर्वा या दोन विद्यार्थिनींचा तोल गेला आणि त्या घरंगळत खाली आल्या.
या अपघातात या दोघीही गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र पूर्वाचा उपचारांआधीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या अपूर्वावर उपचार सुरु आहेत.
या घटनेमुळे पूर्वा राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेला शाळेचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे का? याचा तपास सध्या बदलापूर पूर्व पोलिस करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement