एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंच्या आव्हानावर आशिष शेलारांचं उत्तर
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसं राजकीय तापमान चांगलंच वाढायला लागलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चर्चेसाठी दिलेल्या आव्हान मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी उत्तर दिलं आहे. आधी माझ्याशी निपटा, असं खुलं आव्हान शेलारांनी दिलं आहे.
'आधी माझ्याशी निपटा. जागा तुम्ही ठरवा, वेळ तुम्ही ठरवा, मी चर्चेला येतो' अशा शब्दात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज दिलं आहे. शिवसेना आणि भाजप यांची युती तुटल्यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना डिवचल्याने कलगीतुरा रंगण्याची चिन्हं आहेत.
निवडणुका आल्या की यांना रोड शो सुचतात, लोकल ट्रेनने प्रवास करतात, अशा शब्दात आशिष शेलार यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रोड शोवरही टीकास्त्र सोडलं.
उद्धव ठाकरेंचं आव्हान मुख्यमंत्री स्वीकारणार?
एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि माझी जुगलबंदी होऊन जाऊ द्या, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीला परळमध्ये झालेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे बोलत होते. काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? 'केंद्रीय आर्थिक पाहणीच्या अहवालात आमचं शहर पहिल्या क्रमांकावर आहे. हे आमचं मुंबई महापालिकेतील काम आहे आणि मग हा रिपोर्ट पाहा. मी हा रिपोर्ट बनवलेला नाही. हा अधिकृत आहे. सत्यमेव जयते. कशाला सत्याच्यापुढे अ लावून असत्यमेव जयते करताय. असत्य कधी जिंकणार नाही. तुमच्या थापा मुंबईकरांना पटणार नाहीच. मुंबईकरांसमोर एकाच व्यासपीठावर बोलूया, मी आणि मुख्यमंत्री जुगलबंदी होऊन जाऊ द्या. माझी तयारी आहे. जुगलबंदी कसली तर आम्ही केलेल्या कामांची. मी केलेल्या कामांपैकी एक तरी काम तुम्ही करुन दाखवा, माझं जाहीर आव्हान आहे.' असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.संबंधित बातम्या :
शिवसेनेच्या भाषणात मराठी माणूस, पण कर्तव्यात नाही : मुख्यमंत्री
बदनामी करुन मुंबई जिंकता येणार नाही : उद्धव ठाकरे
आरशासमोर उभे राहा, शिवसेनेचे 63 उमेदवार गुन्हेगार : मुख्यमंत्री
या माफियांनीच मुंबई वाचवली : उद्धव ठाकरे
'बीकेसी'वर शेवटची प्रचारसभा शिवसेनेची की भाजपची?
आरोप करण्यात हे रजनीकांतचे बाप, अनिल परबांचा भाजपवर पलटवार
भाजपची सभाही 'पारदर्शक', कुणीच दिसत नाही, उद्धव ठाकरेंचा टोला
मध्यरात्री ठाणे मनपा आयुक्तांचा फोन आला, ते घाबरलेले आणि... : मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement