एक्स्प्लोर
Advertisement
यूपी-बिहारींना रोखण्यासाठी मार्गदर्शन करा, आसामच्या महिला राज ठाकरेंच्या दारी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आसामच्या महिला शिष्टमंडळाने भेट घेतली.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आसामच्या महिला शिष्टमंडळाने भेट घेतली. आसाममध्येही यूपी-बिहारमधील नागरिकांचा लोंढा वाढत असल्याची समस्या मांडून, या समस्येवर मार्गदर्शनाची विनंती या महिलांनी राज ठाकरेंना केली.
दादरमधील ‘कृष्णकुंज’ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आसामच्या महिलांनी त्यांची भेट घेतली. आसाममधील ‘स्वाधीन स्त्री शक्ती’ असे या महिला संघटनेचं नाव आहे.
आसामाच्या महिलांनी राज ठाकरेंची भेट घेऊन आपलं गाऱ्हाणं मांडलं. महाराष्ट्राप्रमाणेच आसाममध्येही उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांचा लोंढा वाढत आहे. त्यामुळे तेथील भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांवर गदा येत आहे. हीच स्थिती महाराष्ट्रात आहे आणि इथे राज ठाकरे कायम आवाज उठवत असतात. त्यामुळे आसाममधील महिलांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली.
आसामममध्ये येणाऱ्या यूपी-बिहारच्या नागरिकांचा लोंढा कमी करण्यासाठी काय करता येईल, याबाबत या महिलांनी राज ठाकरेंना मार्गदर्शनाची विनंती केली. यावेळी या महिलांनी राज ठाकरेंना राखीही बांधली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
भारत
Advertisement