एक्स्प्लोर
राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचं निधन
फक्त पोलिस महासंचालक म्हणून इनामदार यांची कारकीर्द गाजली नाही तर साहित्य वर्तुळातही त्यांचा वावर होता. पोलीस लेखक म्हणूनही अरविंद इनामदार प्रसिद्ध होते. खुसखुशीत भाषा शैली आणि विनोदबुद्दीमुळे ते ऐकणाऱ्यांच्या मनाची सहज पकड घेत असत.
![राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचं निधन Arvind Inamdar Retired DGP Maharashtra passed away राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचं निधन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/11/08095815/inamdar2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचं दीर्घआजाराने निधन झालं. मुंबईतील हरकिसनदास रुग्णालयात पहाटे अडीचच्या सुमारात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 79 वर्षांचे होते. मंत्रालयाजवळील शलाका या निवासस्थानी त्यांचं पार्थिव सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. तर मरीन लाईनमधील चंदनवाडी इथे सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून इनामदार यांची ओळख होती. अरविंद इनामदार यांनी नाशिकमधील पोलिस प्रशिक्षण केंद्रात दीर्घकाळ काम केलं. त्यांच्या नेतृत्त्वात पोलिस दलात अनेक विद्यार्थी घडले. अरविंद इनामदार यांनी गाजलेलं जळगाव सेक्स स्कॅण्डलचं प्रकरण यशस्वीपणे हाताळलं होतं. त्यांनी नेहमीच पोलिस खात्यातील अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींवर सतत हल्ला चढवला होता. यामुळे ते नेहमीच चर्चेत असत. या सद्गुणांचा मोठा फटका आपल्याला बसल्याचंही त्यांनी मुलाखतींमधून सांगितलं आहे.
फक्त पोलिस महासंचालक म्हणून इनामदार यांची कारकीर्द गाजली नाही तर साहित्य वर्तुळातही त्यांचा वावर होता. पोलीस लेखक म्हणूनही अरविंद इनामदार प्रसिद्ध होते. खुसखुशीत भाषा शैली आणि विनोदबुद्दीमुळे ते ऐकणाऱ्यांच्या मनाची सहज पकड घेत असत. आपल्यावर भगवद्गीताचा मोठा प्रभाव असल्याचे अरविंद इनामदार कायम सांगायचे. आईने चौथ्या वर्षी आईने हातात भगवद्गीता दिल्याची आठवण इनामदारांनी 'माझा कट्टा'वर सांगितली.
अरविंद इनामदार यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर गावात झाला होता. अरविंद इनामदार 1 ऑक्टोबर 1997 ते 5 जानेवारी 2000 या दरम्यान राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत होते. पोलिस खात्यातील सर्वोच्च पदावर काम करताना वेळप्रसंगी सरकारच्या निर्णयाला विरोध करत, एक वर्ष आधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)