एक्स्प्लोर

API सचिन वाझेंची महाराष्ट्र एटीएसकडून पुन्हा होऊ शकते चौकशी 

API Sachin Waze :  मनसुख हिरेन यांच्या पत्नीने आपल्या स्टेटमेंटमध्ये एपीआय सचिन वाझे यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी त्यांची चौकशी करु शकतात.  

मुंबई :  मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केलं. तसंच त्यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशयही विरोधकांनी व्यक्त केला. परंतु सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालत आहे. वाझेंना तात्काळ अटक व्हायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. काही दिवसांपूर्वी मनसुख यांचा मृतदेह कळवा खाडीत मिळून आला. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या स्टेटमेंटनुसार एटीएसनं अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचे पुरावे नष्ट केल्याप्रकरणाचाही गुन्हा दाखल केला आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार  सचिन वाझे यांना सोमवारी दुपारी एटीएस  कार्यालयात बोलावलं होतं. तिथं त्यांना  20 जिलेटिनसह मिळालेल्या स्कॉर्पियो प्रकरणाविषयी प्रश्न केले गेले. या प्रकरणात वाझे तपास अधिकारी होते.  मनसुख हिरेन यांच्या पत्नीने आपल्या स्टेटमेंटमध्ये एपीआय सचिन वाझे यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी त्यांनी चौकशी करु शकतात.  दरम्यान पत्रकारांशी बोलताना सचिन वाझे म्हणाले की, सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. अशा प्रश्नांची उत्तरं इथं देऊ शकत नाही. ते म्हणाले की, जे आरोप माझ्यावर लावण्यात आले आहेत. ते मी वाचलेले नाहीत. मी ते वाचून उत्तर देईल. 

ख्वाजा युनूसच्या मृत्यूनंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचं आयुष्यचं बदलून गेलं..

देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात बोलताना म्हटलं की, "आज सभागृहात मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब वाचून दाखवला. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली. मनसुख हिरेन यांची गाडी स्फोटकं ठेवण्यासाठी वापरली, ती गाडी नोव्हेंबरपासून 5 फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझे वापरत होते, असं त्यांच्या पत्नीने स्पष्टपणे सांगितलं. इतकंच नाही तर याप्रकरणाचा तपास केवळ सचिन वाझे यांनी केला. तीन दिवस ते रोज सचिन वाझेंसोबत जायचे आणि रात्री यायचे, हे देखील पत्नीने सांगितलं. माध्यमांनी मनसुख हिरेन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर आणलं. त्यांच्या पत्नीने सांगितलं, ते पत्रही स्वत: सचिन वाझे यांना वकिलांकडे देऊन पाठवायला लावलं. एवढंच नाही सचिन वाझे यांनी माझ्या पतीला तुम्ही दोन तीन दिवस अटक व्हा, मग मी बाहेर काढतो, असंही सांगितलं. माझ्या पतीचा खून सचिन वाझेंनी केला, असा जबाब पत्नीने दिला आहे." 

सचिन वाझेंना तात्काळ अटक व्हायला हवी
फडणवीस पुढे म्हणाले की, "मनसुख हिरेन यांचं शेवटचं टॉवर लोकेशन हे गावडे यांच्या प्रॉपर्टीवर दिसतं. गावडे हे 2017  च्या खंडणीच्या प्रकरणात गावडे आणि सचिन वाझे या दोघांना एकत्रित आरोपी केलं होतं. या दोघांना अंतरिम जामीन मिळाला आहे. म्हणजे गावडे आणि वाझे एकत्र होते याचा हा भक्कम पुरावा आहे. हिरेन गावडेंच्या प्रॉपर्टीवर जातात जी वसईत आहे आणि त्यानंतर रेतीबंदरला त्यांचा मृतदेह मिळतो, सरळसरळ अर्थ असा आहे, त्यांची हत्या झाली आहे. एवढे भक्कम पुरावे असताना, आमची मागणी एवढीच होती की सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्सचे मुंबईचे प्रमुख आहे. ते पदावर असताना त्यांना पुरावे नष्ट करण्याचे संधी आहे, रिसोर्सेस आहेत. एटीएसजवळ एवढ्या बाबी असताना त्यांना त्यांना पदावर ठेवून त्यांची चौकशी होऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाचं जी गाडी वापरली ती त्यांच्याकडे चार महिने होती, मनसुख हिरेनला ओळखत होते हे लपवले, त्यामुळे त्यांना तात्काळ अटक व्हायला हवी."

सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालत आहे
राज्य सरकार पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना वाचवत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की, "आमच्या लक्षात आलं, सचिन वाझेंना बाजूला केलं तर अनेकांची नावं समोर येऊ शकतात. आम्ही अध्यक्षांजवळ बसलो, त्यावेळी गृहमंत्र्यांनी कबुल केलं त्यांना हटवण्याचं. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, त्यानंतर मात्र जे ठरलंय त्याबाबत बदलले. सचिन वाझेंना पदावरुन दूर करणार नाही अशाप्रकारची भूमिका सरकारने घेतली. आमचा स्पष्ट आरोप आहे सरकार त्यांना पाठिशी घालत आहे. याचं कारण काय हे शोधण्याची गरज आहे. याच्या पाठीमागे कोण कोण आहे, सचिन वाझे कोणाकोणाची नावं सांगेल, या भीतीने सरकार पाठिशी घालत आहे. यामध्ये अनेकांची नावं समोर येत आहेत. हे सरकार पूर्णपणे उघडं पडलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uttarakhand landslide risk 2025: उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत! संपूर्ण राज्य भूस्खलनाच्या धोक्यात, केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक, तब्बल 51 डेंजर झोन
उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत! संपूर्ण राज्य भूस्खलनाच्या धोक्यात, केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक, तब्बल 51 डेंजर झोन
आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार 'हे' मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार 'हे' मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर! FRP चे तुकडे, एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटलं असतानाच 15 रुपयांची कपात; असली 'दलाली' बंद करा, राजू शेट्टींचा हल्लाबोल
पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर! FRP चे तुकडे, एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटलं असतानाच 15 रुपयांची कपात; असली 'दलाली' बंद करा, राजू शेट्टींचा हल्लाबोल
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Udaypur Leopard : घरात घुसलेल्या बिबट्याला महिलेनं चक्क दोरीने बांधले
Nashikkar Help Nanded | नांदेड पूरग्रस्तांसाठी नाशिककर मदतीला धावले, 900 किटची मदत
Anil Deshmukh Fake Attack | पोलिसांच्या तपासात 'हल्ला' खोटा, B Final Report कोर्टात सादर
Dr. Hedgewar Bharatratn | डॉ. हेडगेवार यांना 'भारतरत्न' देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
Navratri Rain Impact | भाविकांची संख्या घटली, तुळजापुरात व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttarakhand landslide risk 2025: उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत! संपूर्ण राज्य भूस्खलनाच्या धोक्यात, केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक, तब्बल 51 डेंजर झोन
उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत! संपूर्ण राज्य भूस्खलनाच्या धोक्यात, केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक, तब्बल 51 डेंजर झोन
आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार 'हे' मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार 'हे' मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर! FRP चे तुकडे, एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटलं असतानाच 15 रुपयांची कपात; असली 'दलाली' बंद करा, राजू शेट्टींचा हल्लाबोल
पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर! FRP चे तुकडे, एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटलं असतानाच 15 रुपयांची कपात; असली 'दलाली' बंद करा, राजू शेट्टींचा हल्लाबोल
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक
Crime News: मिरारोडमध्ये गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर अंडं फेकलं, पोलिसांच्यादेखत जोरदार राडा, नागरिक संतप्त
मिरारोडमध्ये गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर अंडं फेकलं, पोलिसांच्यादेखत जोरदार राडा, नागरिक संतप्त
Philippines Earthquake: फिलीपाईन्समध्ये 6.9 तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा; मृतांची संख्या 26 वर, 147हून अधिक नागरिक जखमी, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
फिलीपाईन्समध्ये 6.9 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा हादरा; 26 नागरिकांचा मृत्यू, तर 147हून अधिक जखमी, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Mhada Lottery homes: मोठी बातमी: म्हाडा लॉटरीतील घर पाच वर्ष न विकण्याची अट काढून टाकली जाणार, फ्लॅट लगेच विकता येणार?
म्हाडाच्या घरांबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता, फ्लॅट पाच वर्ष न विकण्याची अट काढून टाकली जाणार?
Horrific accident : नवरात्रीदरम्यान भीषण अपघात; भरधाव वेगातील बस घुसली दुर्गा मंडपात, २० जण चिरडले; ड्रायव्हर दारूच्या नशेत अन्...
नवरात्रीदरम्यान भीषण अपघात; भरधाव वेगातील बस घुसली दुर्गा मंडपात, २० जण चिरडले; ड्रायव्हर दारूच्या नशेत अन्...
Embed widget