एक्स्प्लोर
Advertisement
खडसेंविरोधातील याचिका मागे घेण्यासाठी पाकिस्तानातून धमकी : अंजली दमानिया
खडसेंविरोधात दाखल केलेल्या याचिका मागे घेण्यासाठी पाकिस्तानमधून धमकीचा फोन आल्याचा आरोप अंजनी दमानियांनी केला. या प्रकरणी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये अंजली दमानियांनी तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : खडसेंविरोधात दाखल केलेल्या याचिका मागे घेण्यासाठी पाकिस्तानमधून धमकीचा फोन आल्याचा आरोप अंजनी दमानियांनी केला. या प्रकरणी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये अंजली दमानियांनी तक्रार दाखल केली आहे.
अंजली दमानियांनी एकनाथ खडसेंविरोधात वेगवेगळ्या प्रकरणात याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिका मागे घेतल्या नाही, तर जीवाचं बर वाईट केलं जाईल, असा निनावी फोन आल्याचा आरोप दमानियांनी केला आहे.
दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. तसेच याप्रकरणी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल करण्यात आली असल्याचं दमानिया यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, जळगावमध्ये खडसेंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दमानिया आणि खडसेंमध्ये वाग्युद्ध रंगलं आहे. मुक्ताईनगरमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमात एकनाथ खडसेंनी आपल्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं.
तसेच, एकनाथ खडसे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडीओ अंजली दमानिया यांनी ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडीओच्या आधारेच खडसेंना अटक करावी अशी मागणी दमानियांनी केली होती.
दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांचे आरोप फेटाळले लावले होते. मी कोणाचा अवमान केला नाही तसंच मी कोणाचंही नाव घेतलं नाही, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना होती.
संबंधित बातम्या
एकनाथ खडसे यांना तातडीने अटक करा : अंजली दमानिया
VIDEO : मुंबई : मुख्यमंत्री आणि पोलिसांमध्ये खडसेंवर कारवाईची हिंमत नाही : अंजली दमानिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement