(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अटक करायला आलेल्या पोलिसांवर सोडला कुत्रा, सोबत ऑक्सिजन मशिन घेऊन फिरायचा; अशी झाली क्रिकेट बुकी जयसिंघानीला अटक
Anil Jaisinghani Bookie Arrested: अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनिल जयसिंघानी या क्रिकेट बुकीला पोलिसांनी गुजरातच्या गोध्रा शहरातून अटक केली आहे.
Anil Jaisinghani Bookie Arrested: तब्बल सात वर्षांनंतर वादग्रस्त क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याला आज मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखाने अटक केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फरार असणारा अनिल जयसिंघानी याला अटक करण्यासाठी विशेष ऑपरेशन राबवण्यात आले होते. अटक करायला गेल्यानंतर जयसिंघानीयाने पोलिसांवर कुत्रा सोडला होता आणि तिथून पळाला होता. तसेच तब्बल तीन वेळा पोलिस पोहोचायच्या आतच तो फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
जयसिंघानी इंटरनेटचा वापर करून अनेकांच्या संपर्कात होता अशी माहिती पोलिसांना होती. तो वापरात असलेले मोबाईल फोन आणि इतर काही तांत्रिक वस्तू पोलिसांनी जप्त केली असून तो कोणकोणत्या राजकीय नेत्यांच्या आणि पोलीस अधिकारांच्या संपर्कात होता यांची माहिती घेण्याचं काम सुरु आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलने रविवारी रात्री 11.45 वाजता गुजरातमधील गोध्रा सीमेवरून त्याला अटक केली. त्याच्यासोबत त्याचा नातेवाईक आणि ड्रायव्हरलाही अटक केली असून कार ताब्यात घेण्यात आली आहे.
तीन वेळा पोलिसांच्या हातून निसटला
जवळपास तीन वेगवेगळ्या ठिकाणी, पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी तीन मिनिटे तो निघून गेला. पोलीस आपल्या पाठीमागे असल्याची त्याला जाणीव होती आणि ते सतत पळत होते. त्याच्यासोबत वेगवेगळ्या कंपन्यांचे डिव्हाइसेस आणि इंटरनेट वापरण्यासाठी असणारी विविध यंत्रणाही जप्त करण्यात आली आहे.
अनिल जयसिंघानी खूप चलाख असून या आधीही त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिली आहे. एका क्षणी पोलिसांच्या पथकाने त्याच्या घरावर छापा टाकला होता, तेव्हा पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने पोलिसांच्या टीमवर कुत्रा सोडला होता आणि त्या ठिकाणाहून पळून जाण्यात तो यशस्वी झाला होता. जयसिंघानी आपल्या सोबत ऑक्सिजन मशिनही घेऊन फिरत होता आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो आजारपणाचे नाटक सुरू करायचा. त्याच्याकडे वेगवेगळे मोबाईल फोन आणि सिमकार्ड असून तो वायफाय डोंगल वापरत होता. तो फक्त संपर्कासाठी व्हॉट्सअॅप कॉल वापरत होता.
- आरोपीवर पाच राज्यात 15 गुन्हे दाखल आहेत.
- आरोपी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन ओळख लपवून राहत होता.
- पोलिसांची पाच पथके यावर काम करत होती..
- त्यानुसार तीन पथके गुजरात राज्यात पाठवण्यात आली आणि दोन पथक महाराष्ट्र काम करत होते.
- आरोपी हा महाराष्ट्रात शिर्डीला 13 मार्च ला होता, शिर्डीतून गुजरातच्या बरदोली 14 मार्चला तो गेल्याची माहिती होती.
- या आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली गेली
- आरोपीने 72 तास गुजरातमध्ये पोलिसांना चकवा दिला होता.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांना धमकी देत एक कोटी रुपये देण्याची ऑफर देण्यात आलेल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनिक्षा जयसिंघानी उल्हासनगर येथून गुरुवारी अटक केली होती. अनिक्षा जयसिंघानीयाला शुक्रवारी न्यायालयात हजर करून तिला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मात्र तिचे पिता अनिल हे मुख्य आरोपी असून ते अजून फरार आहेत.
ही बातमी वाचा: