Aditya Thackeray: जयसिंघानी यांना मातोश्रीवर कोणी आणलं, ते कोणत्या जिल्ह्यातले हे सर्वांना माहित; आदित्य ठाकरे यांचे निर्देश कुणाकडे?
Anil Jaisinghani Bookie Arrested: अनिल जयसिंघानी कोणत्या जिल्ह्यातील आहेत हे सर्वांनाच माहिती आहे असं सांगत आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे कोणाकडे निर्देश केले, याची चर्चा रंगली आहे.
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आज पोलिसांनी अनिल जयसिंघानी यांना अटक केली आहे. जयसिंघानी यांच्या अटकेवरून आता राज्याचं राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. अनिल जयसिंघानी यांना मातोश्रीवर कोण आणलं होतं, ते कोणत्या जिल्ह्यातील आहेत हे तपासा असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे कोणाकडे निर्देश केले, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पोलिसांनी अटक केलेला अनिल जयसिंघानी याचा मातोश्रीवर गेलेला एक फोटो व्हायरल होत होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामागे राजकीय लागेबंध असल्याचा आरोप केला होता. त्यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, अनिल जयसिंघानी मातोश्रीवर आले होते हे आपण पाहिलं आहे. जयसिंघांनी यांना मातोश्रीवर कोणी आणलं होतं हे सर्वांना माहिती आहे. ते कोणत्या जिल्ह्यातील आहेत बघा.
अनिल जयसिंघानीया कोण आहे?
- उल्हासनगरमधील क्रिकेट बुकी
- 2010 साली छोटा बुकी म्हणून ओळखला जायचा
- 2010 साली सट्टा घेताना पंचतारांकित हॉटेलमध्ये अटकेत
- 'ब्लू बॉय ऑफ मुंबई' ओळख असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा जवळचा व्यक्ती
- जवळचा व्यक्ती मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर सीपी ऑफिसमध्ये वर्दळ वाढली
- 1995 साली काँग्रेसकडून उल्हासनगर पालिका निवडणूक लढवली
- 1997 ला पुन्हा काँग्रेसकडून निवडणुक लढली मात्र पराभव झाला
- 2002 साली राष्ट्रवादीत प्रवेश आणि पालिका निवडणुकीत विजयी
- मागील नऊ वर्षापासून फरार, 15 गुन्ह्यांची विविध पोलीस ठाण्यात नोंद
काय आहे प्रकरण?
एका केसमध्ये मदत मागण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या तरुणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील (Mumbai) मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये (Malabar Hill Police Station) 20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला. अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ही बातमी वाचा: