एक्स्प्लोर

Diwali 2023 : दिवाळीत फटाके फोडताना कोणती काळजी घ्याल? महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

Diwali 2023 : फटाके फोडताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे कोणत्या बाबी टाळाव्यात याबाबतचे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मुंबई : दिवाळी (Diwali) हा दिव्यांचा सण म्हणून साजरा केला जातो. फटाके, फराळ,नवे  कपडे अशा अनके गोष्टींनी या सणाची शोभा वाढते. पण बऱ्याचदा फटाके (Firecrackers) फोडताना काळजी न घेतल्यामुळे काही दुर्घटना घडतात. त्यामुळे दीपावलीच्या मंगलमय कालावधीमध्ये कोणती दक्षता बाळगावी याबाबत अग्निशमन दलाकडून आवाहन करण्यात आले आहे. शेषतः फटाके फोडताना लहान मुलांची अधिक काळजी घ्‍यावी. यंदाच्या दिवाळीमध्ये उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, रात्री 8 ते 10 या कालावधीमध्येच फटाके फोडण्यास परवानगी देण्यात येईल. 

या कालावधीत जर आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तात्काळ 101 या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे  नागरी मदत सेवेसाठी 1916 यावर संपर्क साधावा, असं आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरवर्षी अतिशय उत्साहात आपण सारेजण दीपावली सण साजरा करतात.  या मंगलमय प्रसंगी दीपोत्सव साजरा करीत असतांना फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची सजावट तसेच विद्युत रोशणाई केली जाते. काहीवेळा उत्साहाच्या भरात नकळत आगीच्या दुर्घटनांना निमंत्रण दिलं जातं.  त्यामुळे आगीच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्याकरीता योग्य काळजी घेतल्यास दीपावली सणाचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल.तर या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन मुंबईकरांना करण्यात आलंय. 

फटाके फोडताना कोणती काळजी घ्यावी

फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावेत. फटाके मुलांपासून लांब ठेवावेत आणि फोडतांना मोठ्या व्यक्तींनी सोबत रहावे. फटाके फोडताना नेहमी पादत्राणे वापरावीत.  फटाके लावताना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी आणि भाजल्यास  तात्काळ भाजलेल्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे. फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती आणि फुलबाजाचा वापर करावा. अशा प्रकारे फटाके फोडताना काळजी घेण्यास मुंबईकरांना सांगण्यात आलं आहे. 

फटाके फोडताना कोणत्या बाबी टाळाव्यात

इमारतीच्या आत आणि जिन्यावर फटाके फोडू नयेत.  फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा वापर टाळावा. झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत. खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या / दिवे लावणं टाळावं. विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा वाहनतळाच्‍या ठिकाणी फटाके फोडू नयेत. इमारतीला रोशणाई करतांना विद्युत तारांची जोडणी ओव्हरलोड करू नये, सैल जोडणी टाळावी.

दरम्यान वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उच्च न्यायालयाकडून काही निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे फटाके फोडण्यासाठी रात्री 8 ते 10 असा दोन तासांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात प्रदूषणावर नियंत्रणमिळण्यास मदत होऊ शकते. 

हेही वाचा : 

Diwali 2023 : बांधकामांवर निर्बंध, फटाके फोडण्यास 2 तासांचा अवधी, डेब्रीज ट्रकवर पूर्ण बंदी, मुंबईच्या प्रदूषणावर हायकोर्टाचे धडाकेबाज निर्देश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget