एक्स्प्लोर

मुंबईतील 'या' भागात गुरुवारी 18 तास पाणीपुरवठा बंद, चार दिवस पाणी उकळून प्यावे, महापालिकेचे आवाहन

Mumbai Water Supply : पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून 4 ते 5 दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबई : शहरातील के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगमवाहिनीवरील (आऊटलेट)  झडपा (वॉल्व्ह) बदलण्याच्या कामामुळे गुरुवार, दिनांक 19 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून शुक्रवार, दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून प्यावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केलं आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागातील वेरावली जलाशय-2 येथे 750 मिलीमीटर व्यासाच्या पार्ले वेसावे (वर्सोवा) निगमवाहिनीवरील (आऊटलेट) चार झडपा (वॉल्व्ह) बदलण्यात येणार आहेत. गुरुवार, दिनांक 19 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार, दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेदरम्यान हे काम केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीदरम्यान के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे

के पूर्व - महाकाली मार्ग, पूनम नगर, गोनी नगर, तक्षशिला मार्ग, एमएमआरडीए वसाहत, दुर्गा नगर, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर ए पंजाब, बिंद्रा संकूल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे ४.३० ते सकाळी ७.५० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पूर्व - सुंदर नगर, गौतम नगर, मॉडर्न बेकरी, प्रजापूरपाडा (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - पहाटे ५.०० ते सकाळी ८.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पूर्व - त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, अचानक कॉलनी, कलेक्टर कंपाऊंड, सारीपूत नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ८.०० ते सकाळी १०.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पूर्व – दुर्गानगर, मातोश्री क्लब (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

के पश्चिम- सी.डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी मार्केट, भर्डावाडी, नवरंग सिनेमाच्या मागे, अंधेरी गावठाण, आंब्रे गार्डन पंप व गझदर पंप, गिल्बर्ट हिलचा काही भाग, तीन नळ, गावदेवी डोंगरी मार्ग, उस्मानिया डेअरीचा काही भाग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी ७.३० ते दुपारी १२.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे. आऊटलेट दुरुस्ती कामानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा स्वबळाचा नारा, स्वबळावर मनसेचं कधी किती बळ?Zero Hour  : जागावाटपाच्या चर्चेत शाहांचं वक्तव्य म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंवर दबावतंत्र?Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणूक : सुपरफास्ट बातम्या : 16 OCT 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
बोपदेव घाट अत्याचारातील आरोपीचे 3 लग्न, एका महिलेशी संबध; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती
New Justice Statue : भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
Solaur vidhansabha : शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
Embed widget