एक्स्प्लोर
Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकींचं लाडक्या 'झिशू'सोबत आयुष्यभराचं ट्विनिंग; बाप-लेक जिथेही दिसले सारख्याच कपड्यांत दिसले
Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकींची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकींचं मुलासोबत अगदी घनिष्ठ नातं होतं, ते दोघे जिथेही जायचे तिथे मॅचिंग कपडे घालून जायचे.

Baba Siddique And Zeeshan Siddique Best Father Son Duo twinning on every occasion
1/23

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला (शनिवारी) रात्री गोळ्या झाडून मुंबईत हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय विश्वात एकच खळबळ उडाली, त्यांच्या जाण्याने त्यांच्या मुलाला चांगलाच धक्का बसला.
2/23

बाबा सिद्दीकींचं मुलगा झिशान सिद्दीकीसोबत (आमदार) अनोखं नातं होतं. हे बाप-लेक जिथेही कुठे एखाद्या खास कार्यक्रमाला जायचे, तिथे ते मॅचिंग कपडे घालून जायचे.
3/23

अगदी पक्षाच्या कार्यक्रमापासून ते बॉलीवूड पार्टीज पर्यंत प्रत्येक ठिकाणी दोघे सारख्याच कपड्यांमध्ये दिसून आले आहेत.
4/23

अगदी धार्मिक कार्यक्रमांमध्येही बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी सारख्या कपड्यांमध्ये दिसून यायचे.
5/23

बाबा सिद्दीकींचं त्यांच्या मुलावर अतोनात प्रेम होतं, त्यांनी त्यांच्या मुलाला फुलासारखं जपलं आणि वाढवलं.
6/23

सिद्दीकींनी लहानपणापासून मुलाला अगदी अंगाखांद्यावर खेळवलं. त्यांनी झिशानला कसलीच कमी पडू दिली नाही.
7/23

लहानपणापासूनच सिद्दीकी मुलासोबत ट्विनिंग करत आले, मॅचिंग कपडे घालत आले.
8/23

राजकीय क्षेत्रात क्वचितच एखाद्या बापलेकाचं इतकं घट्ट नातं असेल आणि म्हणूनच वडील गेल्याचा धक्का झिशान सिद्दीकींना सहन झाला नाही.
9/23

आपल्या डोळ्यासमोर आपल्या वडिलांना मारलं गेलं, या धक्क्यातून झिशान अजूनही सावरले नाही.
10/23

13 ऑक्टोबरला बाबा सिद्दीकी यांना अखेरचा निरोप देण्यात आला, यावेळी पार्थिव कब्रस्तानात घेऊन जाताना झिशान यांनी एकच टाहो फोडला.
11/23

भर पावसात झिशान सिद्दीकी ओक्साबोक्शी रडले, यावेळी जवळच्या मित्रांनी त्यांना धीर दिल्याचं पाहायला मिळालं.
12/23

आपले वडील गेल्याचं दु:ख त्यांना पेलवलं नाही. बाबा सिद्दीकी जिथे जिथे जायचे तिथे झिशान त्यांच्यासोबत असायचा.
13/23

असा क्वचितच एखादा कार्यक्रम असेल जिथे सिद्दीकींसोबत झिशान दिसला नसेल.
14/23

पॉलिटीकल रॅलीमध्ये देखील ते मॅचिंग कपड्यांत दिसून यायचे.
15/23

हज यात्रेला देखील दोघे सारख्या कपड्यांत दिसून यायचे.
16/23

इफ्तार पार्टीत देखील दोघांचा अनोखा अंदाज पाहायला मिळायचा.
17/23

प्रत्येक वर्षी ते वेगळ्या गेट अपमध्ये दिसून यायचे.
18/23

कोरोनो काळातही या दोघांना सारख्या कपड्यांत पाहण्यात आलं.
19/23

झिशान आणि बाबा सिद्दीकींमध्ये अपार प्रेम होतं.
20/23

झिशानशिवाय बाबा सिद्दीकींचं पानही हलायचं नाही.
21/23

लहानपणापासून मुलाचे खूप लाड त्यांनी केले.
22/23

प्रत्येक पावलावर मुलाची साथ दिली.
23/23

आणि आता अर्ध्या वाटेवर एकटं पडल्याने झिशान सिद्दीकींवरचं छत्रच जणू हरपलं.
Published at : 14 Oct 2024 03:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion