Mumbai Maratha Protest: सरकारला आंतरवाली सराटीप्रमाणेच पुन्हा मराठ्यांवर हल्ला करायचाय, पण... आझाद मैदान खाली करण्याच्या नोटीसनंतर मनोज जरांगेंचा सहकारी काय म्हणाला?
Mumbai Maratha Protest: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. अशातच मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना आझाद मैदान खाली करण्याचे आदेश दिल्याची चर्चा.

Manoj Jarange Patil Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात शड्डू ठोकून बसलेले मनोज जरांगे पाटील यांना आता मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) आझाद मैदानातील आंदोलन थांबवा, अशी नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवारी रात्रीच मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या कोअर कमिटीला ही नोटीस पाठवल्याचे समजते. मात्र, पोलिसांनी मनोज जरांगेंना आझाद मैदान (Azad Maidan) खाली करण्यास सांगितले आहे किंन नाही, याबाबत संभ्रम आहे. आंदोलन करण्यासाठी न्यायालय आणि पोलीस यांच्याकडून घालून देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन करण्यात आल्याने जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनासाठी परवानग्या नाकारण्यात आल्याचे पोलिसांच्या नोटीसमध्ये म्हटले आहे. या नोटीसनंतर मनोज जरांगे यांच्या कोअर कमिटीचे सदस्य चंद्रकांत भराट यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी आम्हाला रस्ते रिकामे करा सांगितले होते. त्यानुसार आमच्या आंदोलकांना गाड्या रस्त्यावरुन हटवल्या आहेत. पण आता सरकारकडून विनाकारण त्रास दिला जात आहे. बाहेरगावातून मराठा आंदोलक मुंबईत आले किंवा अन्नधान्य व खाद्यपदार्थ घेऊन येणाऱ्या गाड्यांना आझाद मैदानातच यावे लागते. त्यामुळे साहजिकच इथे गर्दी होणारच. गर्दी होणारच नसेल तर आंदोलन कसलं?, असा सवाल चंद्रकांत भराट यांनी उपस्थित केला. सरकारला मराठा आंदोलकांना कोणत्याही परिस्थितीत त्रास द्यायचा आहे. मात्र, हे आंदोलन दडपशाहीने दडपले जाणार नाही. आम्ही शांतपणे हे आंदोलन सुरु ठेवू. मराठा आंदोलकांनी बहुतांश गाड्या रस्त्यावरुन काढून पार्किंगमध्ये नाहीतर नवी मुंबईला नेल्या आहेत. मात्र, सरकार उलट दबावतंत्राचा आणखी वापर करत आहे. मराठा आंदोलनाच्यावेळीच सरकारने जाणुनबुजून नवा कायदा केला. आंदोलनासाठी रोजच्या रोज परवानगी घ्यायची. आझाद मैदानात अनेकजण कित्येक दिवस आंदोलन करतात. मग मराठा आंदोलनाबाबतच असा नियम का केला जातो, असा सवाल चंद्रकांत भराट यांनी विचारला.
Maharashtra | Mumbai Police issues notice to Maratha Quota Activist Manoj Jarange Patil for violating rules after court orders. The permission to hold a protest has been denied as he violated the terms and conditions given by the court and police to hold the protest. The Azad… https://t.co/skdYeNgrm8
— ANI (@ANI) September 2, 2025
आझाद मैदानात फक्त 5 हजार मराठा आंदोलक असतील, हे आम्हाला मान्य आहे. पण बाकीचे मराठा आंदोलक कुठे बसवायचे? सरकारने मराठा आंदोलकांचं खाणं-पिणं बंद केलं, मग त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ घेऊन गाड्या आल्या. हे सगळं खाणार कुठे रस्त्यावरच ना? आता सरकार पोलिसांवर दबाव टाकत आहे. गेल्यावर्षी 29 ऑगस्टला आंतरवाली सराटीत पोलिसांनी आमच्यावर हल्ला केला तसं इकडेही करायचं असेल. पण आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, असे चंद्रकांत भराट यांनी म्हटले.
आणखी वाचा
























