एक्स्प्लोर

Mumbai Boat Accident : नीलकमल बोटीखालून अचानक हात बाहेर आला अन् 14 वा मृतदेह सापडला; 26 तासांनी हंसाराम भाटींचं शव मिळालं

Mumbai Boat Accident : बोट अपघातातील मृत व्यक्तींचा शोध सुरु असतानाच 14 वा मृतदेह सापडला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवला असता मृत व्यक्तीची ओळख पटली आहे.

Mumbai Boat Accident : मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ (Gateway Of India Boat Accident) येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीच्या अपघातातील मृतांची संख्या आता 14 झाली आहे. गुरूवारी अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या सांगाड्यात आणखी एक मृतदेह सापडल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. 

14 व्या मृतदेहाची ओळख पटली...

बोट अपघातातील मृत व्यक्तींचा शोध सुरु असतानाच 14 वा मृतदेह सापडला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवला असता मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. मालाडचे रहिवासी असलेले हंसाराम भाटी हे 43 वर्षांचे होते. मालाडचे रहिवासी असलेले भाटी यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय आहे. आपली पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा यांच्याबरोबर ते तानाजी नगर परिसरात राहात होते. 

दोन दिवसांपूर्वी राजस्थानमधील नातेवाईक प्रवीण राठोड आणि नीता हे त्यांच्याकडे राहण्यासाठी आले होते. तेव्हा नातेवाईकांना घेऊन गेट वे ऑफ इंडिया आणि एलिफंटाला जाण्याचा भाटी यांनी प्लॅन केला. मात्र, बोट दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात राठोड दाम्पत्य आणि भाटी यांची पत्नी तसेच मुलगा तरुण वाचला आहे. 

सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान बोटीखालून हात बाहेर आल्याचे समजताच पथकाने त्या भागात शोध सुरु केला. त्यानंतर बचाव पथकाने बोटीखाली अडकलेला मृतदेह काढण्यास सुरुवात केली. बोटीचा काही भाग कापून मृतदेह बाहेर काढून जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतदेह हंसाराम भाटी यांचा असल्याचं स्पष्ट होताच भाटी कुटुंबियांनी टाहो फोडला. 

उत्तर प्रदेशातून लग्नासाठी आलेल्या महिलेचा बोट अपघातात मृत्यू

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून आलेल्या 50 वर्षीय रामरती देवी गुप्ता यांचा बोट अपघातात मृत्यू झाला. त्या नालासोपारा पूर्व येथे राहणाऱ्या त्यांच्या धाकट्या बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी आल्या होत्या. लग्न 11 डिसेंबरला झाल्यानंतर बुधवारी रामरती देवी गुप्ता आपल्या पुतण्या आणि मुलीसह मुंबई फिरायला गेल्या होत्या. या दरम्यान, बोटीतून एलिफंटा बेट पाहत असताना बोटीला अपघात झाला. बोट उलटल्यामुळे त्या पाण्यात पडल्या. त्यांचे पुतणे गौतम गुप्ता यांनी सांगितले की, पाण्यात जवळपास 15 मिनिटे ते संघर्ष करत होते. त्यांनी रामरती देवींच्या बचावासाठी खूप प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने त्यांना वाचवता आले नाही. हा अपघात त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आघात असून संबंधित घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बोट अपघातातील मृतांची नावे :

1. महेंद्रसिंग शेखावत (नौदल)
2. प्रवीण शर्मा
3. मंगेल (नौदल बोट कर्मचारी)
4. मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी जहाज)
5. राकेश नानजी अहिरे (प्रवासी जहाज)
6. साफियाना पठाण
7. माही पावरा (3 वर्ष)
8. अक्षता राकेश अहिरे
9. मिथु राकेश अहिरे (8 वर्ष)
10. दीपक व्ही.

11. हंसाराम भाटी

(दोन महिला यांची अद्याप ओळख पटलेली नाही.)

हे ही वाचा :

Mumbai Boat Accident : एलिफंटा दुर्घटनेतील मृतांची नावं समोर, पाच जणांचा शोध लागलाच नाही, मृतांची संख्या वाढणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
GBS Outbreak : पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
Ahilyanagar Crime : पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळेAjit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दमABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP MajhaMNS Melava Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा, NSCI डोम येथे आयोजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
GBS Outbreak : पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
Ahilyanagar Crime : पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
Ajit Pawar in Beed: तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
चिनी कंपन्यांचा धमाका सुरुच, अलीबाबाकडूनही एआय मॉडेल लाँच, DeepSeek अन् चॅट जीपीटी पेक्षा दमदार कामगिरीचा दावा
चिनी कंपन्यांचा धमाका सुरुच,  अलीबाबाकडूनही एआय मॉडेल लाँच, DeepSeek अन् चॅट जीपीटी पेक्षा दमदार कामगिरीचा दावा
Passenger Plane and Helicopter Collide in America : प्रवासी विमान आणि हेलिकाॅप्टरची भीषण धडक; धडकेनंतर विमान थेट नदीत कोसळले, बचावकार्य सुरु
Video : प्रवासी विमान आणि हेलिकाॅप्टरची भीषण धडक; धडकेनंतर विमान थेट नदीत कोसळले, बचावकार्य सुरु
Crops Price Lower Than the MSP : कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर पिकाला हमीभावापेक्ष कमी दर; तुरीचे दर मागील तीन महिन्यात 4 हजाराने कोसळले
कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर पिकाला हमीभावापेक्ष कमी दर; तुरीचे दर मागील तीन महिन्यात 4 हजाराने कोसळले
Embed widget