Mumbai Boat Accident : एलिफंटा दुर्घटनेतील मृतांची नावं समोर, पाच जणांचा शोध लागलाच नाही, मृतांची संख्या वाढणार?
Gateway Of India Boat Accident : घटना प्रत्यक्षात घडली त्यावेळी दोन्ही बोटींमध्ये प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 114 जण होते. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
Gateway Of India Boat Accident : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरुन (Gateway Of India Boat Accident) एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट बुडाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तर, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.आता या संदर्भात मृतांची नावे समोर आली आहेत.
घटना प्रत्यक्षात घडली त्यावेळी दोन्ही बोटींमध्ये प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 114 जण होते. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, पाच जणांचा शोध अद्याप सुरु आहे. 97 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. या घटनेतील मृतांची नावे समोर आली आहेत.
बोट अपघातातील मृतांची नावे :
1. महेंद्रसिंग शेखावत (नौदल)
2. प्रवीण शर्मा
3. मंगेल (नौदल बोट कर्मचारी)
4. मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी जहाज)
5. राकेश नानजी अहिरे (प्रवासी जहाज)
6. साफियाना पठाण
7. माही पावरा (3 वर्ष)
8. अक्षता राकेश अहिरे
9. मिथु राकेश अहिरे (8 वर्ष)
10. दीपक व्ही.
(दोन महिला आणि एका पुरुषाची अद्याप ओळख पटलेली नाही.)
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
गेट वे ऑफ इंडिया बोट अपघात दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घडलेल्या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत दोन लाखांची मदत मृतांच्या वारसांना जाहीर केली आहे.
नेमकी घटना काय घडली?
'नीलकमल' ही प्रवासी बोट पर्यटक आणि प्रवाशांना घेऊन घारापुरीकडे जात होती. बुधवारी दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी नौदाच्या एका स्पीड बोटीने या प्रवासी बोटीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे ही बोट पाण्यात बुडाली. मात्र, अपघाताची माहिती मिळताच नौदल, तटरक्षक दल आणि मुंबईसागरी पोलिसांच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नौदलाच्या 11 नौका, तटरक्षक दलाची एक आणि यगोलेट पोलीस ठाण्याच्या 3 नौका त्याचबरोबर स्थानिक मच्छीमार नौकांच्या साहाय्याने मदतकार्य करण्यास सुरुवात झाली. यामध्ये नौदलाच्या हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली.
हे ही वाचा :