(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mhada lottery 22024: Video: म्हाडाच्या पवईतील लॅव्हिश घराचा व्हिडिओ समोर; जाणून घ्या किंमत; तुम्ही केलाय ना अर्ज
Mhada lottery 22024: म्हाडाकडून (Mhada) 2030 घरांसाठीच्या सोडतीपैकी पवईतील मध्यम गटासाठी देण्यात येत असलेल्या घराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Mhada lottery 22024: मुंबई : राजधानी मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी म्हाडा लॉटरी 2024 नुकतेच जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीतील घरांच्या किंमतीवरुन चर्चा झाल्यानंतर, आणि नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाकडून या घरांच्या किंमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. तसेच, म्हाडासाठी अर्ज करण्याची मुदतदेखील 19 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे, म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना व इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळातर्फे यंदा 2030 घरांसाठी (Mhada Lottery 2024) लॉटरी काढण्यात आली. मुंबईतील गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ, पवई यांसह विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी निघणार आहे. त्यापैकी, पवईतील लॅव्हिश सदनिकांचा व्हिडिओ म्हाडाने शेअर केला आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळातर्फे (Mhada lottery 2024) काढण्यात येत असलेल्या 2030 घरांसाठीच्या सोडतीपैकी म्हाडाकडून (Mhada) पवईतील मध्यम गटासाठी देण्यात येत असलेल्या घराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, या फ्लॅटची डिझाईन, कारपेट एरिया, फर्निश आणि टॉयलेट बाथरुमचे दृश्य पाहायला मिळते. पवईतील (Pawai) हे घर मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांच्या निश्चितच पसंतीस पडेल असे आहे. कारण, उत्तम लूक, वेल डेकोरेटेड आणि किचन व स्टायलिश असे अत्याधुनिक सोयी-सुविधांनी ही सदनिका (Home) आपली वाट पाहात आहे. मुंबईच्या (Mumbai) पवई उपनगरच्या गृहप्रकल्पात हे घर तुम्हाला म्हाडाच्या लॉटरीतून घेता येईल.
म्हाडाच्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरुन व्हिडिओसह माहितीही शेअर करण्यात आली आहे. ''म्हाडाने पवईमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्जित तयार सदनिकांचा सुंदर गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. या गृहप्रकल्पाचा समावेश मुंबई लॉटरीमध्ये करण्यात आला असून MHADA Lottery या मोबाईल ॲपवर किंवा https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करून म्हाडा मुंबई लॉटरीमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामुळे, मुंबईकरांचे पवईमध्ये हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकारता येईल.'', असे म्हाडाने म्हटलं आहे. विशेष म्हणजे पवई उपनगरात मध्यम उत्पन्न गटासाठीचे हे घर एकदम लॅव्हिश आणि सुविधसंपन्न असल्याचं दिसून येतं.
घरांच्या किंमती 1 कोटी 20 लाख ते 1 कोटी 49 लाख
म्हाडाच्या पवई उपनगरातील या घरांच्या किंमती 1 कोटी 20 लाख ते 1 कोटी 49 लाख रुपयांपर्यंत आहेत. त्यात, 1 कोटी 44 लाख रुपयांनाही काही घरे आहेत. म्हाडाच्या आरक्षणानुसार ह्या घरांसाठी अर्ज करता येईल. त्यात, अनुक्रमांक 15 मधील मध्यम उत्पन्न गटांसाठी एकूण 112 सदनिका आहेत. तर, अनुक्रमांक 16 मध्ये 117 सदनिका आहेत. तसेच, अनुक्रमांक 17 मध्ये 106 सदनिका आहेत. ज्या घरांची किंमत अनुक्रमे 1 कोटी 20 लाख, 1 कोटी 49 लाख आणि 1 कोटी 44 लाख रुपये असणार आहे. आरक्षण गटनिहाय ही घरे विभागली गेली आहेत.
म्हाडाने पवईमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्जित तयार सदनिकांचा सुंदर गृहप्रकल्प उभारलेला आहे. या गृहप्रकल्पाचा समावेश मुंबई लॉटरीमध्ये करण्यात आलेला आहे. MHADA Lottery या मोबाईल ॲपवर किंवा https://t.co/qcLWXn8xsi या संकेतस्थळावर अर्ज करून म्हाडा मुंबई… pic.twitter.com/q4cnD705qA
— MHADA (@mhadaofficial) September 2, 2024