बापलेक एकमेकांशी बोलत प्लॅटफॉर्मवरून रेल्वे ट्रॅकवर उतरले अन् घट्ट मिठी मारत स्वतःला लोकल ट्रेनसमोर झोकून दिलं
Bhayandar : मुंबईतील भाईंदर रेल्वे स्थानकावर जाऊन बाप-लेकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगावर काटा आणणारे फुटेज सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
![बापलेक एकमेकांशी बोलत प्लॅटफॉर्मवरून रेल्वे ट्रॅकवर उतरले अन् घट्ट मिठी मारत स्वतःला लोकल ट्रेनसमोर झोकून दिलं Bhayandar The bapleks came down from the platform to the railway track talking to each other and threw themselves in front of the local train with a tight hug बापलेक एकमेकांशी बोलत प्लॅटफॉर्मवरून रेल्वे ट्रॅकवर उतरले अन् घट्ट मिठी मारत स्वतःला लोकल ट्रेनसमोर झोकून दिलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/2ba9bcbb15debed935031be2daa914961720548020026924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhayandar : मुंबईतील भाईंदर रेल्वे स्थानकावर जाऊन बाप-लेकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगावर काटा आणणारे फुटेज सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. रेल्वे स्थानकावर बाप-लेक एकत्रच आले होते. त्यानंतर ते प्लॅटफॉर्मवरुन ट्रॅकवर उतरले त्यानंतर घट्ट मिठी मारुन ते रेल्वेखाली गेले आणि जीवन यात्रा संपवली. आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव जय मेहता असे होते. तो 22 वर्षांचा होता. दरम्यान बाप-लेक नालासोपारा येथील राहिवासी असल्याची माहिती असून या प्रकरणी वसई पोलीसात गुन्हा दाखल झाला करण्यात आलाय.
लोको पायलला रेल्वे अचानक थांबवणे शक्य झाले नाही
बाप लेक अचानक रेल्वे ट्रॅकसमोर आल्याने लोको पायलला रेल्वे अचानक थांबवणे शक्य झाले नाही. लोको पायलटने रेल्वे थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र, तो अपयशी ठरला. दोघे पिता-पुत्र विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनसमोर आडवे झाले. बाप लेकाच्या अंगावरुन लोकल ट्रेन गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान, अद्याप आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. मात्र, रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक लोकल ट्रेनसमोर दोन जण येताना पाहून ट्रेनच्या ड्रायव्हरने लोकल ट्रेन थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ट्रेन थांबली तोपर्यंत दोघेही ट्रेनखाली आले. आत्महत्या केलेले दोघेही बाप-लेक असून ते नालासोपारा येथील रहिवासी होते. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एडीआरशिवाय गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
पोर्शे कारनंतर वरळी हिट अँड रन केसमध्येही रवींद्र धंगेकर अॅक्शन मोडवर, थेट पोलीस ठाण्यात पोहोचले, मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)