एक्स्प्लोर

सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध; कोर्टाकडून 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

Baba Siddiqui Murder Case : आरोपीचं खरं वय तपासण्यासाठी ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. त्यानुसार, टेस्ट करण्यात आली असून आरोपी धर्मराज कश्यप अल्पवयीन नसल्याचं सिद्ध झालं असून त्यालाही 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Baba Siddiqui Murder Case : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे (NCP) नेते बाब सिद्दिकी (Baba Siddiqui) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. याप्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर, एक आरोपी अद्याप फरार आहे. अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं. त्यापैकी एक आरोपी गुरनैल सिंहला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली, तर दुसरा आरोपी धर्मराज अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद करण्यात आला होता. आरोपीचं खरं वय तपासण्यासाठी ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. त्यानुसार, टेस्ट करण्यात आली असून आरोपी धर्मराज कश्यप (Dharmraj kashyap) अल्पवयीन नसल्याचं सिद्ध झालं असून त्यालाही 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

आरोपीचे ओसीफिकेशन टेस्ट करा, न्यायालयाचे निर्देश 

बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना काल (रविवारी) किला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यापैकी एका आरोपीला न्यायालयानं 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, दुसरा आरोपी धर्मराज कश्यप अल्पवयीन असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केला होता. आरोपी धर्मराज कश्यपचे वय 17 वर्षांचं आहे. त्यामुळे त्याच्यावर अल्पवयीन आरोपी म्हणून खटला चालवावा. वयाच्या खात्रीसाठी वैद्यकीय चाचणीस आम्ही तयार आहोत, असा दावा आरोपींच्या वडिलांनी केला होता. त्यानंतर आरोपीचं खरं वय तपासण्यासाठी न्यायालयानं ओसीफिकेशन चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. 

बाबा सिद्दीकींची हत्या करणारा अल्पवयीन नाहीच, ओसीफिकेशन टेस्टमधून सिद्ध 

बाबा सिद्दीकींची हत्या करणारा आरोपी धर्मराज कश्यप याची ओसीफिकेशन टेस्ट करण्यात आली. टेस्टचा अहवाल समोर आला असून आरोपी अल्पवयीन नसल्याचं सिद्ध झालं आहे. टेस्टचा अहवाल आल्यानंतर आरोपी धर्मराज कश्यपला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयानं त्यालाही 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते बाब सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली असून झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. झिशान सिद्दिकींच्या ऑफिसबाहेर घरी जाण्यासाठी निघाले असता बाबा सिद्दिकींवर गोळीबार करण्यात आला. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे, तर या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. करनैल सिंह हरियाणा, धर्मराज कश्यप उत्तर प्रदेश  अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावं आहेत. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तीनही आरोपी हे रिक्षानं घटनास्थळी आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
Nobel In Economic Sciences : अअमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी; एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले, इंडिगोच्या 2 विमानांचीही तपासणी
मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी; एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले, इंडिगोच्या 2 विमानांचीही तपासणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 14 October 2024Kurla house of Baba Siddique Shooters : बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्यांचं मुंबईतील राहतं घर पहाTop 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट : ABP Majha : 05 PM : 14 OCT 2024Chandgad Vidhan Sabha : चंदगड विधानसभेवरुन घमासान, भाजप-राष्ट्रवादीत जागेवरुन राडा! ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjivraje Naik Nimbalkar : साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
साम, दाम, दंड भेद वापरण्याचे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, पण दिल्लीसमोर झुकणारे आम्ही नाही; संजीवराजेंचा एल्गार
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
आनंदाची बातमी! पुणेकरांना आणखी दोन नव्या मेट्रो मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या कसा असेल मार्ग?
Nobel In Economic Sciences : अअमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला
मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी; एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले, इंडिगोच्या 2 विमानांचीही तपासणी
मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी; एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले, इंडिगोच्या 2 विमानांचीही तपासणी
शिवसृष्टीतील राड्यानंतर छगन भुजबळ तडकाफडकी येवल्यात दाखल; म्हणाले, छत्रपती शिवरायांसमोर शिवीगाळ करणं....
शिवसृष्टीतील राड्यानंतर छगन भुजबळ तडकाफडकी येवल्यात दाखल; म्हणाले, छत्रपती शिवरायांसमोर शिवीगाळ करणं....
Lawrence Bishnoi Baba Siddique Vastav EP 94 : लॉरेन्स बिश्नोईला पाठीशी कोण आणि का घालतंय?
Lawrence Bishnoi Baba Siddique Vastav EP 94 : लॉरेन्स बिश्नोईला पाठीशी कोण आणि का घालतंय?
Mahayuti Government : महायुती सरकारची उद्या संयुक्त पत्रकार परिषद; मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार?
महायुती सरकारची उद्या संयुक्त पत्रकार परिषद; मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार?
योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
Embed widget