एक्स्प्लोर

योजना राबवा, पैसे द्या, पण राजकीय स्टंट करू नका; लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून छत्रपती संभाजीराजे कडाडले

Chhatrapati Sambhajiraje : नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आलेल्या एका 53 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.

नांदेड : जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आलेल्या एका 53 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शांताबाई शिवाजी मोरे (53, रा. भनगी, ता.जि. नांदेड) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणावरून छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी राज्य सरकारवर (Maharashtra Government) निशाणा साधला.

छत्रपती संभाजीराजेंची राज्य सरकारवर टीका

काल नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होता. सकाळी दहा वाजल्यापासून महिलांना सक्तीने बोलण्यात आले. यात एका महिलेचा मृत्यू झाला. पण प्रशासनाकडून सांगितले की, अटॅक आला. तुम्ही पैसे द्या. त्यांच्या अकाउंटवर पैसे टाका तुमचं कौतुक आहे. ण राजकीय स्टंट करू नका, असे म्हणत छत्रपती संभाजीराजेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 

विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा लावण्याचा आमचा मानस

दरम्यान, विधानसभा निवडणुकीबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा लढण्याचा आमचा माणस आहे आणि अनेक लोक आमच्याशी संपर्कात आहेत. आम्ही विस्थापित लोकांना संधी देणार आहोत. पण चांगले लोक प्रस्थापितांमधून आले तर त्यांचे पण आम्ही स्वागत करू. मविआ आणि महायुतीत गोंधळ सुरु आहे. त्यांनाच माहीत नाही की त्यांचे नाराज लोक कुठे जाणार आहेत. थोड्या दिवसात वेगळे चित्र दिसेल. मनोज जरांगे पाटील यांना मी विनंती केलेली आहे की, पाडण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आपली लोकं तुमच्या माध्यमातून असेल किंवा स्वराज्याच्या माध्यमातून असेल हे लोक विधानसभेच्या पटलावर आपला आवाज मांडू शकतील, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे. 

मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकेल की नाही हा प्रश्न

उद्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे , मात्र सरकारने मराठा समाजाला दिलेल दहा टक्के आरक्षण टिकेल की नाही याबाबत समाज शाश्वत नाही, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. समाजाचा आग्रह होता मराठा कुणबी एकच आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं नाही. मी सुद्धा ही लढाई 2007 पासून लढलो. दहा टक्के आरक्षण टिकेल की नाही माहित नाही, असे त्यांनी म्हटले आहे.  

मराठा-ओबीसीत वाद होऊ नये 

काल येवल्यात मराठा आंदोलक आणि भुजबळ समर्थकांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. याबाबत छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, अशा घटना होऊ नये. आपण समाज म्हणून एकत्रित राहतो. मराठा असो की ओबीसी असो की अन्य कोणता समाज आपल्याला एकत्र सुखाने राहायचे आहे. मोठ्या नेत्यांनी पण दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करू नये,  असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

आणखी वाचा 

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल, अँजिओप्लास्टी झाल्याची सूत्रांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
Australia vs India 2nd Test: ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
Raj Thackeray and Mahayuti : मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 8  डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :   7 AM : 8 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
गारठा वाढतोय! आजपासून किमान तापमान घटणार, पुण्यात 14-15 अंश, तुमच्या शहरात कसं राहणार हवामान? वाचा IMD चा अंदाज
Australia vs India 2nd Test: ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडसोबत पंगा, सुनील गावसकरांनी मोहम्मद सिराजला खडसावलं, म्हणाले....
Raj Thackeray and Mahayuti : मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
Embed widget