एक्स्प्लोर

Mahayuti Government : महायुती सरकारची उद्या संयुक्त पत्रकार परिषद; मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार?

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक लक्षात घेता महायुतीकडून शासन निर्णयांचा धडाकाच लावण्यात आला आहे. जवळपास साडेबाराशेच्या आसपास शासकीय निर्णय घेण्यात आले आहेत.

Mahayuti Government : महाविकास आघाडीची काल (13 ऑक्टोबर) संयुक्त पत्रकार परिषद पार पडल्यानंतर आता महायुतीकडून सुद्धा संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बिगुल उद्याच (15 ऑक्टोबर) वाजण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर महायुतीची सुद्धा संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेतून कोणती माहिती दिली जाणार? याकडे लक्ष असेल. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक लक्षात घेता महायुतीकडून शासन निर्णयांचा धडाकाच लावण्यात आला आहे. जवळपास साडेबाराशेच्या आसपास शासकीय निर्णय घेण्यात आले आहेत. जवळपास सर्वच घटकांना खुश करून टाकण्याचा प्रयत्न शिंदे सरकारकडून करण्यात आला आहे. उद्या दुपारी अडीच वाजता एमसीए सभागृहात पत्रकार परिषद होणार आहे. 

शासन निर्णयांचा धडाका सुरुच 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारची आज शेवटची मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या बैठकीमध्येच मंत्र्यांना बैठकीचा अजेंडा देण्यात आला. आजच्या बैठकीतही 19 शासन निर्णय जारी करण्यात आले. यामध्ये मुंबईमधील 5 प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ करण्यात आला असून आज रात्री 12 वाजेपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

कोणते शासन निर्णय घेण्यात आले? 

मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.

✅आगरी समाजासाठी महामंडळ

✅समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

✅दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

✅आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

✅वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

✅राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

✅पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

✅खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

✅राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

✅किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ

✅अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

✅मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

✅खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

✅मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

✅अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

✅‘उमेद’साठी अभ्यासगट

✅कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान

दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहावर खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुरज मांढरे उपस्थित होते.

पॅरिस, फ्रान्स येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेमधील 50 मीटर रायफल 3 पोझीशन या उपप्रकारामध्ये कास्य पदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळे व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील गोळाफेक या उपप्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी या खेळाडूंचा व प्रशिक्षक दीपाली देशपांडे व खिलारी यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.

स्वप्निलला दोन कोटी रुपये तसेच त्यांच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना 20 लाख रुपये व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी यास तीन कोटी रुपये तसेच त्यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना 30 लाख रुपयांचा धनादेश व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 11 डिसेंबर 2024Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  5 PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaKurla Bus Inside CCTV : कुर्ला बस अपघाताचा बसच्या आतील सीसीटीव्ही समोर, थरकाप उडवणारा व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
बाप रे... 9 महिन्यात 18 हजार पुणेकरांना चावले भटके कुत्रे; महापालिका म्हणतेय नोंदणी ऑनलाईन
बाप रे... 9 महिन्यात 18 हजार पुणेकरांना चावले भटके कुत्रे; महापालिका म्हणतेय नोंदणी ऑनलाईन
Best Bus Accident: मोठी बातमी! मुंबईच्या CSMT रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसनं आणखी एकाला चिरडलं
मोठी बातमी! मुंबईच्या CSMT रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसनं आणखी एकाला चिरडलं
सॅमसंगचा लय भारी गॅलॅक्‍सी एस 24 अल्‍ट्रा अन् गॅलॅक्‍सी एस 24 स्‍मार्टफोन्‍स लाँच, किंमत किती?  
सॅमसंगचा लय भारी गॅलॅक्‍सी एस 24 अल्‍ट्रा अन् गॅलॅक्‍सी एस 24 स्‍मार्टफोन्‍स लाँच, किंमत किती?  
Embed widget